आकस्मिकता निधीतून काढलेल्या रकमेचा वापर मात्र नगण्यच

By Admin | Published: April 14, 2016 01:09 AM2016-04-14T01:09:59+5:302016-04-14T01:09:59+5:30

अचानक निर्माण झालेल्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आकस्मिकता निधीतून रक्कम काढली जाते. २०१४-१५ मध्ये या निधीतून काढलेल्या रकमेचा नगण्य वापर केल्याची धक्कादायक

The amount used by the contingency fund is only negligible | आकस्मिकता निधीतून काढलेल्या रकमेचा वापर मात्र नगण्यच

आकस्मिकता निधीतून काढलेल्या रकमेचा वापर मात्र नगण्यच

googlenewsNext

मुंबई : अचानक निर्माण झालेल्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आकस्मिकता निधीतून रक्कम काढली जाते. २०१४-१५ मध्ये या निधीतून काढलेल्या रकमेचा नगण्य वापर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
विशेषत: नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी मोठ्या रकमा या निधीतून काढण्यात आल्या. मात्र, त्यांचा वापर अनुक्रमे १२.२६ टक्के, ६.८७ टक्के आणि १७.१६ टक्के इतकाच करण्यात आला. त्यातील पहिल्या दोन रकमा या आघाडी सरकारच्या काळातील तर नंतरची २ हजार कोटी रुपयांची रक्कम विद्यमान सरकारच्या कार्यकाळातील आहे.
अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या निधीचा वापर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांतच अधिक केला जातो हा आजवरचा अनुभव आहे. सध्याचे सरकारही त्याला अपवाद ठरलेले नाही. शेवटच्या तीन महिन्यांत केलेली खर्चाची विविध विभागांनी कशी घाई केली याची पानभर आकडेवारीच अहवालात देण्यात आली आहे.
पुरवणी मागण्या गेल्या काही वर्षांमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहेत आणि त्यावर टीकाही होत आली आहे. एखाद्या विभागासाठीची मूळ अर्थसंकल्पीय तरतूद शिल्लक असतानाही पुरवणी मागण्यांद्वारे आणखी तरतूद करण्यात आल्याची बाबही अहवालात समोर आली आहे. या विभागांची १६ हजार २२ कोटी रुपयांची तरतूद शिल्लक असताना पुरवणीद्वारे १२ हजार ५८६ कोटी रुपयांची तरतूद करणे अनावश्यक होते, असा शेरा अहवालात मारण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)

आकस्मिकता निधी व त्याचा वापर (रक्कम कोटी रु.मध्ये)
निधी मंजुरी दि.विभाग व उद्देशमंजूर निधीवापरलेली रक्कम
५ एप्रिल २०१४नैसर्गिक आपत्ती ८५०१०४.१८ (१२.२६%)
१३ एप्रिल १४नैसर्गिक आपत्ती १५००१०३.११ (६.८७%)
३० आॅगस्ट १४शिक्षण, कला, क्रीडा१.००० (०%)
२० नोव्हेंबर १४इतर प्रशासनिक सेवा०.२२०.१६ (७२.७३%)
२४ नोव्हेंबर १४वनीकरण व वन्यजीव१००० (०%)
१९ जानेवारी १५वनीकरण व वन्य जीव३२.८८ (९६%)
२९ जानेवारी १५मोठे, मध्यम सिंचन०.०३०० (०%)
२ फेब्रुवारी १५नैसर्गिक आपत्ती निवारण२०००३४३.२३((१७.१६)

Web Title: The amount used by the contingency fund is only negligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.