खरीप कर्जवाटपात अमरावती जिल्हा माघारला; शेतकरी संकटात, बँकांचे असहकार्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 06:26 PM2020-08-13T18:26:11+5:302020-08-13T19:00:38+5:30

पश्चिम विभागात यंदा ३० लाख हेक्टरमध्ये खरीप पेरणी झालेली आहे. त्यापूर्वी सोयाबीनचे उगवण नसलेल्या बियाण्यांमुळे शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ आली. कापसाचे चुकारे अद्यापही मिळालेले नाहीत.

Amravati district withdraws in kharif loan disbursement; Farmers in crisis, non-cooperation of banks | खरीप कर्जवाटपात अमरावती जिल्हा माघारला; शेतकरी संकटात, बँकांचे असहकार्य 

खरीप कर्जवाटपात अमरावती जिल्हा माघारला; शेतकरी संकटात, बँकांचे असहकार्य 

Next
ठळक मुद्देआर्थिक संकटात सापडलेला शेतकरी बँकाच्या चकरा मारत असताना त्यांना खरीप पीककर्ज मिळालेले नाही.

अमरावती : खरीप कर्जवाटपाच्या साडेचार महिन्यांनंतरही अमरावती विभागातील बँकांद्वारा लक्ष्यांकाच्या ५० टक्केही कर्जवाटप केलेले नाही. यामध्ये अमरावती जिल्हा सर्वात माघारला आहे. विशेष म्हणजे सर्वच जिल्ह्यात कर्जमाफीचा निधी उपलब्ध झालेला असताना शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया धिमी असल्यामुळे शेतकरी थकबाकीदार राहत आहे. त्यामुळे खरिपाचे कर्जवाटप माघारले आहे.
पश्चिम विभागात यंदा ३० लाख हेक्टरमध्ये खरीप पेरणी झालेली आहे. त्यापूर्वी सोयाबीनचे उगवण नसलेल्या बियाण्यांमुळे शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ आली. कापसाचे चुकारे अद्यापही मिळालेले नाहीत.

आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी बँकाच्या चकरा मारत असताना त्यांना खरीप पीककर्ज मिळालेले नाही. नियमित कर्जदारांना प्रोत्साहन लाभ मिळेल, असे शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याने हे शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. त्यांना बँका कर्ज नाकारत असल्याचे चित्र विभागात दिसून येत आहे. विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या माहितीनुसार, जिल्हा सहकारी बँकांनी सद्यस्थितीत सर्वाधिक ६३.९० टक्के कर्जवाटप केले. यामध्ये बुलडाणा जिल्हा बँकेने लक्ष्यांक पूर्ती केली.

जिल्हा बँकाद्वारा २ लाख २० हजार ३१० शेतक-यांना १,४०६ कोटी २७ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांचे वाटप फक्त ३३.७४ टक्के आहे. या बँकांनी २ लाख १४ हजार ९१६ शेतक-यांना २०१५ कोटी ७५ लाखांचे वाटप केलेले आहे. ग्रामीण बँकांनी आतापर्यंत ४१.५६ टक्के वाटप केले आहे. या बँकांद्वारा विभागात ३९,८१४ शेतक-यांना ३८५ कोटी ३२ लाखांचे वाटप करण्यात आलेले आहे. 

 खरीप कर्जवाटपाची जिल्हानिहाय स्थिती (लाखांत)
 जिल्हा                लक्षांक          खातेदार            रक्कम             टक्केवारी

अमरावती        १७२०००.००       ५८५७५           ५५५४३.१६       ३२.२९
अकोला           ११४०००.००       ८२६१९            ६६६८०.४४       ५८.८३
वाशिम             १५९९१२.००      ७७७१८           ५६२५१.६६         ३५.१८
बुलडाणा         २४६०३५.००      ११२१५३           ८९३३१.७०         ३६.३१
यवतमाळ         २१८२५२.००      १४३९७५          ११२९२८.८१       ५१.७४
एकूण               ९१०१९९.००      ४७५०४०         ३८०७३५.७७       ४१.८३

 

आणखी बातम्या...

CoronaVirus News : नवनीत राणा नागपूरहून मुंबईला रवाना, पुढील उपचार लीलावती रुग्णालयात होणार

महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, सर्व पूल भक्कम - संजय राऊत

शरद पवार कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार; पार्थ प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया    

‘मीच फक्त मॅच्युअर’ असा माझा दावा नाही - शौमिका महाडिक; शरद पवार यांच्या विधानावर टीका    

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय; मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार नोकरी    

Web Title: Amravati district withdraws in kharif loan disbursement; Farmers in crisis, non-cooperation of banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.