अमरावती विभागात तीन वर्षांत दोन हजार अर्भकांचा मृत्यू!

By admin | Published: April 26, 2017 02:26 AM2017-04-26T02:26:53+5:302017-04-26T02:26:53+5:30

बुलडाणा- गत तीन वर्षांच्या कालावधीत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात २ हजार ४१६ अर्भकांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.

Amravati divisions death of two thousand infants in three years! | अमरावती विभागात तीन वर्षांत दोन हजार अर्भकांचा मृत्यू!

अमरावती विभागात तीन वर्षांत दोन हजार अर्भकांचा मृत्यू!

Next

शासकीय योजनांची दिरंगाई उठली मुळावर !

बुलडाणा: शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत होणाऱ्या दिरंगाईमुळे नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. गत तीन वर्षांच्या कालावधीत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात २ हजार ४१६ अर्भकांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.
१ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१७ या तीन वर्षाच्या कालावधीत विदर्भात ५ हजार २४३ अर्भक मृत्यू झाले आहेत. यापैकी २ हजार ४१६ मृत्यू अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटसह इतर जिल्ह्यातील आदिवासी बहुल दुर्गम क्षेत्रामध्ये अर्भक मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. या दरम्यान २६० बाल मृत्यू झाल्याची नोंद आहेत. त्यातही अमरावती जिल्ह्यात १५१ आणि बुलडाणा १०९ बालमृत्यू आहेत. कुपोषण तसेच बाल मृत्यूचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात, मात्र योजना राबविणारे हात दिरंगाई करीत असल्यामुळे अर्भक व बालमृत्यूचे सत्र सुरूच आहे.

Web Title: Amravati divisions death of two thousand infants in three years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.