CoronaVirus News : नवनीत राणा नागपूरहून मुंबईला रवाना, पुढील उपचार लीलावती रुग्णालयात होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 05:46 PM2020-08-13T17:46:32+5:302020-08-13T17:52:09+5:30
नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरु होते.
अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा या नागपूरवरून मुंबईला उपचारासाठी रवाना झाल्या आहेत. नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरु होते. मात्र, त्यांची तब्बेत आणखी बिघडल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ मुंबईला रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईच्या लीलावती रुग्णालयात नवनीत राणा उपचार घेणार आहेत. सध्या त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असून त्यांच्या छातीत खूप दुखत असल्याची माहिती आहे. नवनीत राणा यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या मुलांसाठी घरीच रहात होत्या. त्याच दरम्यान त्यांनाही ६ ऑगस्टला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. धक्कादायक म्हणजे नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांचा रिपोर्ट देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
आणखी बातम्या...
महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, सर्व पूल भक्कम - संजय राऊत
शरद पवार कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार; पार्थ प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
‘मीच फक्त मॅच्युअर’ असा माझा दावा नाही - शौमिका महाडिक; शरद पवार यांच्या विधानावर टीका
पार्थ पवार अपरिपक्व, मागणीला कवडीची किंमत देत नाही - शरद पवार