तुम्ही तुमचं काम करा, तुमचं काय देणंघेणं?; खासदार नवनीत राणा शिवसेना नेते संजय राऊतांवर भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 04:01 PM2021-11-14T16:01:38+5:302021-11-14T16:02:46+5:30

Amravati Violence: ज्याठिकाणी हिंसक आंदोलन झाली तिथं खासदार नवनीत राणा यांनी पाहणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात गृहखातं अपयशी ठरलं असं त्यांनी सांगितले.

Amravati Violence: MP Navneet Rana lashed out at Shiv Sena leader Sanjay Raut | तुम्ही तुमचं काम करा, तुमचं काय देणंघेणं?; खासदार नवनीत राणा शिवसेना नेते संजय राऊतांवर भडकल्या

तुम्ही तुमचं काम करा, तुमचं काय देणंघेणं?; खासदार नवनीत राणा शिवसेना नेते संजय राऊतांवर भडकल्या

Next

अमरावती – त्रिपुरा येथील एका कथित घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात काही शहरांमध्ये अशांतता पसरली आहे. अमरावती जिल्ह्याला त्याचा मोठा फटका बसला आहे. अमरावतीत मागील २ दिवसांपासून जाळपोळ आणि दगडफेक सुरु आहे. अमरावती बंदची हाक देण्यात आली. अमरावतीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून सोशल मीडियावरुन काहीही चुकीची अफवा पसरवू नये यासाठी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

अमरावतीत सुरु असलेल्या हिंसक आंदोलनावरुन स्थानिक खासदार नवनीत राणा कौर भडकल्या आहेत. याबाबत नवनीत राणा म्हणाल्या की, गेल्या २ दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाचा आम्ही निषेध केला आहे. अतिरिक्त पोलीस कुमक जिल्ह्यात मागवली गेली आहे. इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्याठिकाणी हिंसक आंदोलन झाली तिथं खासदार नवनीत राणा यांनी पाहणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात गृहखातं अपयशी ठरलं. गुप्तचर खात्याला त्याची माहिती मिळाली नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच अमरावतीत खूप आर्थिक नुकसान झालं आहे. पहिल्यांदाच अमरावतीत असं घडलं आहे. लोकांना मारहाण झाली. विनाकारण काही जणांना याचा फटका बसला आहे. काही राजकीय नेते स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत. सरकारने या लोकांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. पालकमंत्र्यांनी ज्यारितीने प्रतिक्रिया दिली. काही पक्ष निवडणुकांमुळे हे घडवून आणतायेत. बाकीच्या राज्याच्या निवडणुकांचा अमरावतीशी काय संबंध? असा सवाल नवनीत राणा(Navneet Rana) यांनी विचारला.

त्याचसोबत शिवसेना नेते संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांच्यावरही नवनीत राणांनी टीका केली. ते कोणत्या राज्याचं प्रतिनिधीत्व करतात. कुठे बसला आहात? अमरावतीबद्दल काय बोलताय? काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार करा. अमरावती लोकांबद्दल त्यांना काही माहिती नाही. आम्ही बाहेरच्या आमच्या जिल्ह्याबद्दल बोलण्याचं निमंत्रण दिलं नाही.  तुम्ही तुमचं काम करा जे तुम्हाला येत नाही. तुम्ही बाहेरचे आहात आमच्या जिल्ह्याबद्दल बोलण्याचा अधिकार दिला नाही. तुम्ही तुमचं काम करा अशा शब्दात खासदारांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. दरम्यान, जो अतिसंवेदनशील भाग आहे तिथे लोकांशी बोलायला चालले आहे. सध्या जी परिस्थिती आहे ती शांत करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर ज्या ज्या लोकांचे नुकसान झाले त्याचा आढावा घेऊ त्यानंतर नुकसान भरपाईची मागणी करू असंही नवनीत राणांनी सांगितले.  

Web Title: Amravati Violence: MP Navneet Rana lashed out at Shiv Sena leader Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.