अमरावतीचे सांडपाणी अकोला जिल्‘ात

By admin | Published: June 16, 2014 07:55 PM2014-06-16T19:55:01+5:302014-06-16T20:09:07+5:30

पूर्णेचे पाणी पिण्यास अयोग्य निरीचा अहवाल

Amravati Wastewater in Akola District | अमरावतीचे सांडपाणी अकोला जिल्‘ात

अमरावतीचे सांडपाणी अकोला जिल्‘ात

Next

अकोला : पूर्णा नदीतील पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली तरी ते पिण्यास अयोग्यच असल्याचा अहवाल निरी या संस्थेने दिला आहे. अमरावती जिल्‘ातील केमिकलयुक्त सांडपाणी नदीच्या पात्रात येत असून, जानेवारीनंतर नदीतील नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत बंद होत असल्याने नदीचे पाणी पिण्यास वापरण्यात येऊ नये, असा सल्लाही निरीतर्फे देण्यात आला आहे.


फेब्रुवारी महिन्यात पूर्णा नदीच्या पात्रातील पाणी हिरवे झाल्यामुळे अकोला जिल्‘ातील खारपाणप˜्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर हे पाणी वेगवेगळ्या संस्थांकडून तपासून घेण्यात आले. आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेतही पाण्याची तपासणी करण्यात आली. सर्व तपासण्यांमध्ये पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल मिळाल्यामुळे पाणी दूषित होण्याचे मूळ कारण शोधण्यासाठी जिल्हा परिषदेने निरी या संस्थेची नियुक्ती केली होती. निरीने पूर्णा नदीतील पाण्यातील स्त्रोत तपासून पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल तयार केला आहे. अहवालानुसार पाण्यात सांडपाण्याचे केमिकल आणि बायोलॉजिकल वेस्टपासून निघाणार्‍या केमिकलचे प्रमाण १0 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया करून पाणी पिण्यास वापरता येणार नाही, असे निरीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. 


** चार लाख खर्च करूनही दूषित पाण्याचा स्त्रोत अज्ञातच!
जिल्हा परिषदने चार लाख रुपये खर्च करून निरी या संस्थेला पूर्णा नदीतील पाणी दूषित करणारा स्त्रोत शोधून देण्यास सांगितले होते. निरी या संस्थेने सांडपाण्यामुळे पाणी दूषित झाल्याचा अहवाल दिला आहे; मात्र सांडपाणी कुठले याची माहितीच दिली नाही. त्यामुळे दूषित पाण्याचा स्त्रोत अज्ञातच आहे.

**  अमरावती जिल्‘ातील सांडपाणी अकोल्यात
अमरावती शहरातील सांडपाण्यासह जिल्‘ातील एमआयडीसी परिसरातील सांडपाणी पेढी नदीतून पूर्णा नदीत येत असल्यामुळे पूर्णा नदीचे पाणी दूषित झाले असल्याचा निष्कर्ष निरीने काढला आहे. हेच पाणी नदी पात्रातून अकोला आणि पुढे बुलडाणा जिल्‘ापर्यंत पोहोचते. त्यामुळे पूर्णा नदीचे पाणी पिण्यासाठी वापरणे या दोन्ही जिल्‘ातील नागरिकांसाठी घातक ठरू शकते.
 

Web Title: Amravati Wastewater in Akola District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.