‘अमृतांजन पुलाला ‘हेरिटेज’चा दर्जा द्या’

By admin | Published: June 9, 2017 01:05 AM2017-06-09T01:05:20+5:302017-06-09T01:05:20+5:30

खंडाळा घाटातील अमृतांजन पूल हा हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर करावा, अशी मागणी लोणावळ्याचे नगरसेवक निखिल कविश्वर यांनी केली

'Amritanjan Pula' to be given 'Heritage' status | ‘अमृतांजन पुलाला ‘हेरिटेज’चा दर्जा द्या’

‘अमृतांजन पुलाला ‘हेरिटेज’चा दर्जा द्या’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : इतिहासाची साक्ष देणारा व पुणे जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेला खंडाळा घाटातील अमृतांजन पूल हा हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर करावा, अशी मागणी लोणावळ्याचे नगरसेवक निखिल कविश्वर यांनी केली आहे.
कविश्वर यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देत दीडशे वर्षांपेक्षा अधिक जुना असलेला हा पूल लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायाला चालना देणारा आहे. त्यामुळे पुलाला हेरिटेज वास्तूचा दर्जा देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. अमृतांजन पूल हा वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने तो पाडण्याच्या हालचाली राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केल्या आहेत. त्यावर हरकत घेण्यात यावी व रेल्वेकडून हा पूल नगर परिषदेच्या ताब्यात घ्यावा, अशी मागणी या निवेदनात कविश्वर यांनी केली आहे.
‘ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा’ या लोकमतमधील वृत्ताची दखल कविश्वर यांच्यासह विविध संघटना व माध्यमांनी घेत सदरचा पूल पाडण्याला विरोध सुरू केला आहे. पूल पाडण्याला विरोध दर्शविण्यासाठी जनआंदोलनाच्या हालचाली सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झाल्या आहेत.

Web Title: 'Amritanjan Pula' to be given 'Heritage' status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.