Amruta Fadanvis: पती देवेंद्रांना अमृता फडणवीसांच्या 'आडवळणी' शुभेच्छा, विकासाचा गोड संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 02:28 PM2022-07-22T14:28:13+5:302022-07-22T14:29:20+5:30

जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते

Amruta Fadanvis: Amruta Fadnavis wishes Devendra 'advalani', sweet jilebi message of development | Amruta Fadanvis: पती देवेंद्रांना अमृता फडणवीसांच्या 'आडवळणी' शुभेच्छा, विकासाचा गोड संदेश

Amruta Fadanvis: पती देवेंद्रांना अमृता फडणवीसांच्या 'आडवळणी' शुभेच्छा, विकासाचा गोड संदेश

Next

मुंबई - राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या राजकीय नाट्यात अनेक अंक समोर आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केल्याने राज्यात मोठी उलथापालथ होऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाले. एकनाथ शिंदे भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तर, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार स्विकारला. महाराष्ट्रासाठी राज्यातील भाजप नेत्यांसाठीही हा मोठा धक्का होता. यावेळी, अमृता फडणवीस यांनी नवीन सरकारचं केवळ सरळ शब्दात अभिनंदन केलं होतं. आता, देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा अमृता यांनी दिल्या आहेत.   

अमृता फडणवीस आपल्या ट्विटमधून भावनांना वाट करून देताना दिसतात. पण, सत्तातरानं देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या शुभेच्छांच ट्विट हे अतिशय सरळ-साधे व अत्यंत औपचारिक असल्याप्रमाणे दिसून आले. 'आपले (महाराष्ट्राचे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन आणि वाटचालीसाठी शुभेच्छा', असे औपचारिक ट्विट करत त्यांनी दोघांचे अभिनंदन केले होते. आता, वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी अडथळ्यांची शर्यत पार करत ते पुन्हा आलेच, असेच काहीसे सूचवले आहे.

जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!, असे अमृता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. विशेष म्हणजे पती देवेंद्र यांना जिलेबी खाऊ घालतानाचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.

वाढदिनी भाजपचं आवाहन

देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी असतो. मात्र, या वाढदिनी वर्तमानपत्रातून जाहिराती, बॅनरबाजी किंवा टीव्ही माध्यमातूनही जाहिरातबाजी न करण्याचं आवाहन भापजतर्फे करण्यात आले आहे. भाजपचे कार्यालय सचिव मुकूंद कुलकर्णी यांनी यासंदर्भातील पत्रच जारी केलं आहे. तर, भाजप नेते आणि पदाधिकारी यांनी या खर्चाला फाटा देत सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केलं आहे. 

गुप्तभेटीबद्दलही सांगितलं होतं

विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपण देवेंद्र फडणवीसांना रात्री गुप्तपणे भेटायचो, असं विधान केलं होतं. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यातील गुप्त भेटींबाबत मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्रजी रात्री उशिरापर्यंत काम करतात. त्यामुळे माझ्या फार लक्षात आले नाही. पण कधी कधी ते रात्री उशिरा वेशांतर करून बाहेर पडायचे. मलाही त्यांना ओळखणं कठीण जायचं. मी विचारलं तरी विषय टाळायचे. मात्र काही ना काही चाललंय, याची कल्पना मला आली होती. 
 

Web Title: Amruta Fadanvis: Amruta Fadnavis wishes Devendra 'advalani', sweet jilebi message of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.