Amruta Fadanvis: "मध्यवर्गीय माणसाची व्याख्या काय..?", ईडीच्या कारवाईनंतर अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 02:34 PM2022-04-07T14:34:42+5:302022-04-07T14:38:13+5:30
Amruta Fadanvis: ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले होते, त्यावर अमृता फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने(ED) शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यावर केलीली कारवाई सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ईडीने गोरेगावमधील पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षां राऊत, गुरू-आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडचे माजी संचालक प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्याशी संबंधित 11 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यातच संजय राऊत यांनी दिलेल्या एका स्पष्टीकरणावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृती फडणवीस(Amruta Fadanvis) यांनी टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत म्हणाले होते की, ''कष्टाने कमावलेली संपत्ती ईडीने जप्त केली, ही राजकीय दबावमुळे झालेली कारवाई आहे. माझ्याकडे काहीच संपत्ती नाही, जमिनीचा तुकडा आणि राहते घर याला संपत्ती म्हणत असाल तर संपत्तीची व्याख्याच बदलावी लागेल. माझे 2 रुम किचन एका मराठी माणसाचे घर, एका मध्यमवर्गीय माणसाचे घर आहे. अलिबाग माझे गाव असल्यामुळे 2009 मध्ये तिथे 50 गुंठे जमीन घेतली होती. भ्रष्टाचाराचा एक रुपया, चुकीचा पैसा माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या खात्यावर आला असेल तर संपूर्ण संपत्ती भाजपाच्या खात्यावर जमा करायला मी तयार आहे," असे संजय राऊत म्हणाले होते.
I’m very confused -
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 7, 2022
Please help me with definition of ‘Middle class man’ ??
and does the same definition apply to a ‘Middle Class Politician’ ? #Maharashtra
अमृता फडणवीस यांचा टोला
संजय राऊत यांनी स्वत:चा उल्लेख मध्यवर्गीय केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन नाव न घेता संजय राऊतांवर निशाण साधला. "मी खूप गोंधळली आहे, कृपया मला मध्यवर्गीय माणसाची व्याख्या काय आहे सांगा. हीच व्याख्या मध्यमवर्गीय राजकारण्याला लागू होते का?," असे ट्वीट अमृता फडणवीसांनी केले.