Video - "प्रेम से बोलो, जय लक्ष्मी माता..."; दिवाळीनिमित्त अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 01:15 PM2022-10-24T13:15:17+5:302022-10-24T13:19:02+5:30

Amruta Fadnavis Song : अमृता यांनी "दिवाळी आणि लक्ष्मीपूजेच्या या शुभ प्रसंगी, माझी लक्ष्मी देवीची आरती ऐका आणि भक्तीत तल्लीन व्हा! प्रेम से बोलो, जय लक्ष्मी माता..." असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

Amruta Fadnavis new song Over diwali 2022 Laxmi aarti | Video - "प्रेम से बोलो, जय लक्ष्मी माता..."; दिवाळीनिमित्त अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकलंत का?

Video - "प्रेम से बोलो, जय लक्ष्मी माता..."; दिवाळीनिमित्त अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकलंत का?

googlenewsNext

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात. आपल्या गाण्यांसाठी त्या लोकप्रिय आहेत. दिवाळीनिमित्त त्यांचं आता आणखी एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. "जय लक्ष्मी माता" असे या गाण्याचे बोल आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या गाण्याबाबत माहिती दिली. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 

"दिवाळी आणि लक्ष्मीपूजेच्या या शुभ प्रसंगी, माझी लक्ष्मी देवीची आरती ऐका आणि भक्तीत तल्लीन व्हा! प्रेम से बोलो, जय लक्ष्मी माता..." असं अमृता यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. अमृता यांच्या गाण्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून कौतुकाचा वर्षाव केला आहे. काहींनी गाणं अतिशय सुंदर असल्याचं म्हटलं आहे. अमृता फडणवीस नेहमीच वेगवेगळी गाणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत याआधी 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...' हे अमृता फडणवीसांचं गाणं प्रदर्शित झालं होतं. "जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला - कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.... तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही!" असं या गाण्यात म्हटलं होतं. तसेच व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) निमित्त ‘ये नयन डरे डरे’ हे गाणं देखील गायलं होतं.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Amruta Fadnavis new song Over diwali 2022 Laxmi aarti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.