Amruta Fadnavis : संभाजी भिडेंच्या त्या विधानावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 09:18 PM2022-11-03T21:18:56+5:302022-11-03T21:19:53+5:30

Amruta Fadnavis Criticize Sambhaji Bhide's Statement : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महिलांनी कसं जगावं, हे कुणी सांगू नये, असं विधान अमृता फडणवीस यांनी केलं आहे. 

Amruta Fadnavis spoke clearly on that statement of Sambhaji Bhide, said.... | Amruta Fadnavis : संभाजी भिडेंच्या त्या विधानावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या....

Amruta Fadnavis : संभाजी भिडेंच्या त्या विधानावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या....

googlenewsNext

मुंबई - संभाजी भिडे यांनी मंत्रालयाबाहेर प्रश्न विचारण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराला आधी टिकली लावून ये मग मी बोलेन, असा सल्ला दिल्याने वादाला तोंड फुटले आहे. विविध क्षेत्रातून संभाजी भिडे यांच्या या विधानाचा निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महिलांनी कसं जगावं, हे कुणी सांगू नये, असं विधान अमृता फडणवीस यांनी केलं आहे. 

पंढरपूरमध्ये अमृता फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांना संभाजी भिडेंनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अमृता फडणवीस म्हणाल्या की, संभाजी भिडे गुरुजींचा मी खूप आदर करते. ते एक हिंदुत्वाचे स्तंभ आहेत. पण मला वैयक्तिकरीत्या असं वाटतं की, कुठल्याही महिलेने कसं जगावं, याबाबत कुणी सल्ला देऊ शकत नाही. तिची एक जीवनशैली असते. त्याप्रकारे ती जगते. त्याचा आदर करावा, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. 

संभाजी भिडे यांनी काल मंत्रालयात जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्या भेटीनंतर भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यात ते बोलत होते. त्यावेळी संभाजी भिडेंना मंत्रालयात महिला पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर, तू टिकली लाव. आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे, अन् आमची भारतमाता विधवा नाही. तू आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो, असे म्हणत संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला सल्ला दिला होता. भिडेंनी केलेल्या या विदानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.  

Web Title: Amruta Fadnavis spoke clearly on that statement of Sambhaji Bhide, said....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.