ऐन सणासुदीत महागाईचा झटका! अमूलने दुधाच्या दरात केली वाढ,जाणून घ्या नवे दर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 11:41 AM2022-10-15T11:41:15+5:302022-10-15T12:31:26+5:30
ऐन सणासुदीच्या काळात आता सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसणार आहे.
ऐन सणासुदीच्या काळात आता सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसणार आहे. अमुलने दिल्लीत पुन्हा दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. दिल्लीत एक लिटर फुल क्रीम दुधाची किंमत ६३ रुपये प्रति लिटर झाली आहे. या अगोदर ऑगस्टमध्ये दुधाच्या दरात वाढ केली होती.
काल जाहीर झालेल्या महागाईच्या आकडेवारीनुसार, पशुखाद्याचा महागाई दर ९ वर्षांच्या २५ टक्क्यांहून अधिक विक्रमी पातळीच्या जवळपास राहिला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. अमूलने वाढत्या खर्चाचे कारण देत किमती वाढवत असल्याचे म्हटले आहे.
Atul Bhatkhalkar : "कपटाने आलेले कपटाने गेले"; भाजपाचा जयंत पाटलांना 'त्या' विधानावरून खोचक टोला
जनावरांच्या चाऱ्याची किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे दुधाच्या दरात वाड होत आहे. सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर २५.२३ टक्के राहिला आहे. जो गेल्या वर्षी याच महिन्यात २०.५७ टक्के होता. ऑगस्ट महिन्यात जनावरांच्या चाऱ्याचा दर २५.५४ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता, तो ९ वर्षांतील उच्चांक होता.
Amul has increased prices of full cream milk and buffalo milk by Rs 2 per litre in all states except Gujarat: RS Sodhi, MD, Gujarat Cooperative Milk Marketing Federation Limited pic.twitter.com/rhbBnVFEJp
— ANI (@ANI) October 15, 2022
याअदगोरही दुधाच्या दरात वाढ झाली होती. यावेळी राज्यातील गोकुळ तसेच अन्य डेअरींनीही दरात वाढ केली होती. आता पुन्हा ऐन सणांच्या काळात दुधाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.