महाराष्ट्रातून रोज सरासरी ७० मुली बेपत्ता, रुपाली चाकणकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 12:46 PM2023-05-08T12:46:27+5:302023-05-08T12:46:39+5:30

Rupali Chakankar : जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातून ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे.

An average of 70 girls go missing from Maharashtra every day, according to Rupali Chakankar | महाराष्ट्रातून रोज सरासरी ७० मुली बेपत्ता, रुपाली चाकणकर यांची माहिती

महाराष्ट्रातून रोज सरासरी ७० मुली बेपत्ता, रुपाली चाकणकर यांची माहिती

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था दोन्ही गोष्टी अत्यंत योग्य पद्धतीने पार पडत आहे, अशी माहिती सातत्याने शासनाकडून मिळत असते. परंतू अशा परिस्थितीत एक धक्कादायक माहिती समोर आला आहे. राज्यात रोज सरासरी ७० मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातून ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे.

जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातून १६०० मुली बेपत्ता झाल्या, फेब्रुवारी महिन्यात १८१० तर एप्रिल महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या वाढते आहे हे आपल्यासाठी चिंताजनक आहे. यामध्ये २०२० पासून हरवलेल्या व्यक्तींबाबत दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर आहे, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. तसेच, लग्न, प्रेम आणि नोकरीत आमिष दाखवून मुलींची दिशाभूल केली जात आहे. याशिवाय, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार सुद्धा केले जातात. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे यासंदर्भात गृह विभागाने लवकरात लवकर पाऊल उचलावी, अशी मागणी रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीवरुन मार्च महिन्यात राज्यातून २२००  मुली बेपत्ता झाल्या आहेत, त्या आधी फेब्रुवारी महिन्यात ही संख्या १८१० इतकी होती. त्यामुळे एकाच महिन्यात बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत ३९० ने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हरवलेल्या व्यक्तींची विभाग मुंबई यांच्याकडून आम्ही माहिती घेत असतो. त्यांच्याकडून अहवाल मागवत असतो. प्रत्येक राजकारणाऱ्याकडे मिसिंग सेल आहे. तो कार्यकरत आहे की नाही? असा सवालही रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला आहे.

ग्रामीण भागात वाढते प्रमाण..
विशेष म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे. मार्च महिन्याची आकडेवारी पाहता, पुण्यातून २२५८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यानंतर नाशिकमधून १६१, कोल्हापूर ११४, ठाणे १३३, अहमदनगर १०१, जळगाव ८१ तर सांगलीतून ८२ मुली बेपत्ता झाल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांचं ट्विट!
मुली बेपत्ता होण्याच्या घटनेबाबत सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट केले आहे. हा विषय अतिशय गंभीर असून गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन याबाबत तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. त्या म्हणाल्या, "महाराष्ट्रासह देशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. मुलींची दिशाभूल करुन त्यांचे अपहरण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का? पडत असेल तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर काही होत आहे का? याबाबत महिलांच्या संबंधाने काम करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांची मते जाणून घेऊन  उपाययोजना करणे गरजेचे आहे. हा विषय अतिशय गंभीर असून गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन याबाबत तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे."
 

Web Title: An average of 70 girls go missing from Maharashtra every day, according to Rupali Chakankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.