विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 08:01 AM2024-11-18T08:01:29+5:302024-11-18T08:02:02+5:30

-योगेश बिडवई  मुंबई : लोकसभेत कांद्याने सत्ताधारी पक्षाचा वांदा केल्यानंतर विधानसभेतही कांद्याचा मुद्दा कायम असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळ ...

An important issue again in the assembly elections; Due to onions, farmers in villages and consumers in cities are fed up | विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

-योगेश बिडवई 
मुंबई : लोकसभेत कांद्याने सत्ताधारी पक्षाचा वांदा केल्यानंतर विधानसभेतही कांद्याचा मुद्दा कायम असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळ कांदा संपण्यास सुरुवात झाल्यानंतर कांद्याचे दर वाढले आहेत. 

एकीकडे शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने नाराजी तर दुसरीकडे शहरात कांदा ८० ते १०० रुपये किलो झाल्याने ग्राहक बेजार झाले आहेत. थोडक्यात यंदा प्रथमच ग्रामीण आणि शहरी भागात कांदा वांदा करणार आहे. 

राज्यातील ६० ते ७० मतदारसंघांत कांदा उत्पादन होते. तसेच दरवाढीमुळे शहरातील ५० ते ६० मतदारसंघांत हा महागाईचा मुद्दा झाला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे लोकसभेच्या साधारण १५ मतदारसंघांत सत्ताधारी युतीला फटका बसला होता. 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने निर्यात खुली झाली. मात्र, त्यावर शुल्क कायम ठेवल्याने शेतकऱ्यांचा रोष कमी झाला नव्हता. त्यानंतर भाव हळूहळू वाढू लागले. मात्र, सप्टेंबरनंतर शेतकऱ्यांच्या कांदा संपू लागलाच भावात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरात कांदा ८० ते १०० रुपये किलो झाला आहे. 

तणनाशकांवर मोठा खर्च

सतत ढगाळ वातावरण आणि हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे खरीप कांद्याचे (पोळ) यंदा उत्पादन कमी झाले आहे. दुसरीकडे तण काढण्यासाठी लागणाऱ्या तणनाशकांवर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे. 

१५ दिवसांपूर्वी सोलापूर बाजार समितीत दोन टन कांदा विकला. एक एकर क्षेत्रावर लाल कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र, शेवटच्या टप्प्यात परतीच्या पावसाने ७० टक्के नुकसान झाले. प्रतवारीनुसार कांद्याला क्विंटलमागे ३,२००, २,६००, २,२०० आणि १,३०० रुपये असा भाव मिळाला. कांद्याचे ३८ हजार रुपये झाले. घरातील सर्वजण शेतात काम करत असल्याने मजुरी वाचली, तरीही लागवडीपासून सोलापूर बाजार समितीत कांदा नेण्याचा २५ हजार खर्च झाला. हातात केवळ १३ हजार आले.
-सोमिनाथ घोळवे, 
कांदा उत्पादक, मुंडेवाडी (जि. बीड)

 

Web Title: An important issue again in the assembly elections; Due to onions, farmers in villages and consumers in cities are fed up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.