महाराष्ट्रात 20 हजार कोटींची गुंतवणूक, ‘रिन्यू पॉवर’ उभारणार नागपुरात प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 12:28 IST2023-06-24T12:27:28+5:302023-06-24T12:28:08+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत शुक्रवारी याबाबतचा करार झाला.

महाराष्ट्रात 20 हजार कोटींची गुंतवणूक, ‘रिन्यू पॉवर’ उभारणार नागपुरात प्रकल्प
मुंबई : सौर ऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या सेलचे उत्पादन करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मे. रिन्यू पॉवर लि. ही कंपनी नागपुरात उभारणार आहे. त्यात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल व १० हजार रोजगार निर्मिती होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत शुक्रवारी याबाबतचा करार झाला.
उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि रिन्यू पॉवर प्रा. लि. यांच्यावतीने डॉ. अमित पैठणकर यांनी करारावर स्वाक्षरी केली. प्रकल्पाची माहिती डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली. यावेळी विविध अधिकारी हजर होते.
१०,०००
रोजगार निर्माण होणार
५००
एकरांवरील या प्रकल्पाची उभारणी
२०००
कोटींचे पुरक प्रकल्प या प्रकल्पासाठी उभे राहतील.
राज्यात आलेले अनेक प्रकल्प अल्पावधीतच मोठे झाले आहेत. नविनीकरण ऊर्जा निर्मितीसाठी सरकार सर्व सहकार्य करेल.
- देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री
नविनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे.
- उदय सामंत,
उद्योगमंत्री