अभिनय क्षेत्रातातही अधिकारीच... नाट्यप्रवेशात अमोल यादव यांनी जागवली बळीराजाप्रती संवेदना
By निखिल म्हात्रे | Published: December 11, 2022 05:16 PM2022-12-11T17:16:07+5:302022-12-11T17:16:34+5:30
कोकण महसूल कर्मचाऱ्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेतील बळीराजावर नाट्य प्रवेशात अतिरिक्त जिल्हाधिकारी त्यांनी अमोल यादव यांनी शेतकऱ्याच्या दुःखाचा संवेदनशील प्रसंग उभा केला.
अलिबाग -
कोकण महसूल कर्मचाऱ्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेतील बळीराजावर नाट्य प्रवेशात अतिरिक्त जिल्हाधिकारी त्यांनी अमोल यादव यांनी शेतकऱ्याच्या दुःखाचा संवेदनशील प्रसंग उभा केला. इतका प्रभावी अभिनय केला की एखाद्या रंगभूमीवरील हा कसलेला अभिनेताच हा असावा असे यादव यांना ते प्रशासकीय अधिकारी आहेत हे न माहित असणाऱ्यांना वाटले. संवेदनाहीन म्हणून ठप्पा असलेल्या सनदी सेवेत असेही उच्चकोटीची सामाजिक जाणीव असणारे अधिकारी आहेत, याची प्रातिनिधीक खात्री यादव यांनी दिली.
यादव यांनी आत्महत्या केलेल्या आपल्या शेतकरी बापाची कथा नाट्यप्रवेशात उभी केली. शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा. हे एक जीव नकोसे करणारे मानसिक दडपण. त्यातही कुटुंबातील पत्नी, मुलावर म्हणजेच शेतकरी बापाची आठवण काढणारा शेतकरी मुलगा यांच्यात जीव अडकलेला. बापाचे ते शेवटच्या दिवशी मुलाबाळांसाठी बाजारहाट करून किराणा भरणे. फास घेण्यासाठी दोरी विकत आणणे. आदल्या दिवशी पोराच्या डोक्यातून शेवटचा मायेचा हात फिरवणे. नी अखेर स्वतःला संपविणे. पोराला बसलेला धक्का यादव यांनी अभियनातून समर्थपणे एखाद्या आर्ट फिल्ममधल्या अभिनेत्याप्रमाणे मांडला. शेती असो की प्रशासन. एकाला बळीराजा म्हणतात आणि एकाला लोक राजेशाही समजतात पण दोघांचा मुकूटही अपमान, दुःखांच्या काट्यांनी भरलेला असतो. म्हणून हे बळीराजा तू राजाच आहेस मग काटेरी मुकूटाचा भार का मानतोस, अशी बळीराजाची समजूत घातली आहे.
कोकण महसूल क्रीडा महोत्सवात अन्य अनेक महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या चाकोरीबद्ध कार्यालयीन आयुष्यात बद्ध असलो तरी यांत्रिक नाही हे दाखवून दिले.