अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी आनंदवार्ता ! ‘PRISMA’ अॅप आता प्ले स्टोअरवर उपलब्ध
By admin | Published: July 25, 2016 05:51 PM2016-07-25T17:51:18+5:302016-07-25T17:51:18+5:30
अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची गोष्ट उपलब्ध होणार आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची गोष्ट उपलब्ध होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकांच्या पसंतीस उतरलेलं प्रिझ्मा अॅप आता गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत केवळ अॅपल वापरकर्त्यांसाठी हे अॅप उपलब्ध करून दिलं होतं. या अॅपवरून अनेक अभिनेत्रींनी स्वतःचे फोटो बनवून टाकले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्रींवर या अॅपनं अक्षरशः जादू केली आहे. प्रियंका चोप्रा, दीपिका पदूकोण, आलिया भट सारख्या अभिनेत्रींनी या अॅपमध्ये बनवलेले फोटो सोशल साइटवर अपलोड केले आहेत या अॅपची इंटरनेटवर खूप धूम आहे. आता अँड्रॉईड वापरकर्तेही आपल्या गुगल प्ले स्टोअरवरून प्रिझ्मा अॅप डाऊनलोड करू शकणार आहेत. 7 एमबी एवढी मेमरी असलेलं हे अॅप्लिकेशन अँड्रॉईडच्या ह्यकिटकॅटह्ण आणि त्याहून अपडेटेड व्हर्जन असणा-या वापरकर्त्यांना वापरता येणार आहे.
पेंटिंगसारख्या इफेक्टमुळे कमी कालावधीतच टेक्नोसॅव्हींमध्ये प्रिझ्मा अॅप प्रचंड लोकप्रिय झालं आहे. याआधी केवळ अॅपल वापरकर्तांना वापरता येणारं हे अॅप आता गुगल प्ले स्टोअरवरही उपलब्ध होणार असल्यानं अँड्राइड वापरकर्त्यांमध्ये हे अॅप प्ले स्टोअरवर कधी येतं, याची उत्सुकला लागून राहिली आहे.