अन् व-हाडी नवरीला रेल्वेतच विसरले, पोलिसांच्या सतर्कतेमुळं नवरी पोहचली मंडपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 06:29 AM2018-03-26T06:29:03+5:302018-03-26T06:29:03+5:30

मुलीच्या लग्नासाठी नागपूरहून नाशिककडे निघालेले व-हाडी चक्क नवरीलाच रेल्वेत विसरले

Anand-Hadi Navri has forgotten the railway, due to the police alert, the bride reached the tent | अन् व-हाडी नवरीला रेल्वेतच विसरले, पोलिसांच्या सतर्कतेमुळं नवरी पोहचली मंडपात

अन् व-हाडी नवरीला रेल्वेतच विसरले, पोलिसांच्या सतर्कतेमुळं नवरी पोहचली मंडपात

Next

मनीषा म्हात्रे  
मुंबई : मुलीच्या लग्नासाठी नागपूरहून नाशिककडे निघालेले व-हाडी चक्क नवरीलाच रेल्वेत विसरले. सर्व व-हाडी नाशिकला उतरले. मात्र, रेल्वेच्या शौचालयात गेलेली नवरी गाडीतच राहिली. वºहाड्यांनी मंडप गाठल्यानंतर, नवरी सोबत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोधाशोध सुरू झाली, पण नवरी सापडलीच नाही.
दुसरीकडे इगतपुरी स्थानकात उभ्या असलेल्या गाडीच्या शौचालयात एक मुलगी रडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. इगतपुरी पोलिसांनी तिची चौकशी केली असता, सारा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर, पोलिसांनी तिला सुखरूप लग्नमंडपात पोहोचविले.
नागपूरच्या गोपाळ पेठमध्ये राहणाऱ्या मिरगे यांची मुलगी रजनी हिचा रविवारी दुपारी १ वाजता नाशिक रोड येथे विवाह सोहळा होता. सकाळच्या एक्स्प्रेसने वºहाडी नवरीला घेऊन नागपूरहून नाशिककडे निघाले. सकाळी साडेआठच्या सुमारास गाडी नाशिक रोड स्थानकात आली. त्यापूर्वीच नवरी मुलगी शौचालयात गेली होती. स्टेशन येताच सामान उतरविण्याच्या नादात वºहाडी नवरीला शौचालयात सोडून निघाले. मंडपात पोहोचल्यानंतर नवरीच गायब असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
दरम्यान, शौचालयातून बाहेर आलेल्या नवरीला वºहाडी न दिसल्याने तिची तारांबळ उडाली. अनोळखी चेहरे पाहून तिही रडू लागली. अशातच इगतपुरी स्थानक येताच, रेल्वे पोलिसांकडून सामानाची झडती सुरू झाली. त्याच दरम्यान पोलीस शिपाई गजानन जाधव, अनिता गवई, विकास साळुंखे यांचे लक्ष रजनीकडे गेले. त्यांनी विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. रजनीने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर पोलिसांनी तत्काळ संपर्क साधून वºहाड्यांना मुलीची माहिती दिली.

Web Title: Anand-Hadi Navri has forgotten the railway, due to the police alert, the bride reached the tent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.