CAA : उद्धव ठाकरेंचे दोन्ही दगडांवर पाय : आनंदराज आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 11:12 AM2020-02-23T11:12:34+5:302020-02-23T11:16:45+5:30
तर महाराष्ट्राच्या राजकरणातील नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतची भूमिका 1 एप्रिलला स्पष्ट होणार आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (सीएए) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलं आहे. यावरूनच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री हे दोन्ही दगडांवर पाय ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आनंदराज आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी भाजपला तोडलंय पण पूर्णपणे त्यांच्यासोबतचे संबध त्यांना तोडायचे नाही. तसेच महाविकास आघाडीकरून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जे नव्याने मैत्री केली आहे, ती सुद्धा तशीच टिकवून ठेवायची आहे. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे दोन्ही बाजूने बोलत असून, एकाच वेळी दोन्ही दगडांवर पाय ते ठेवत असल्याचा टोला आनंदराज आंबेडकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.
तर महाराष्ट्राच्या राजकरणातील नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतची भूमिका 1 एप्रिलला स्पष्ट होणार आहे. जेव्हा देशभरात CAA लागू होईल, तेव्हा महराष्ट्रात CAA लागू होईल किंवा नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका काय असणार यावर या महाविकास आघाडीच भवितव्य ठरणार असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले.