उद्यापासून धावणार आनंदवन एक्स्प्रेस
By admin | Published: January 10, 2016 01:21 AM2016-01-10T01:21:25+5:302016-01-10T01:21:25+5:30
कर्मयोगी बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन आनंदवनाची निर्मिती केली. याच आनंदवनच्या नावाने सोमवारपासून रेल्वे प्रवासी गाडी धावणार आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी
वरोरा, चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन आनंदवनाची निर्मिती केली. याच आनंदवनच्या नावाने सोमवारपासून रेल्वे प्रवासी गाडी धावणार आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनल्सहून (सीएसटी) आनंदवन एक्स्प्रेसचा शुभारंभ करणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई- चंद्रपूर-काझीपेठ ही साप्ताहिक आनंदवन एक्स्प्रेस सुरू होत असून तिचा २२१२७-२२१२८ हा क्रमांक आहे. सीएसटीहून सोमवारी सकाळी ११.३० वाजता ही प्रवासी गाडी सुटेल. दिल्लीच्या रेल्वे भवन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर हे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, अकोला, धामणगाव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर, बेलमपल्ली, मंचेरीयल, रामागुंडम, पेदापल्ली व काझीपेठ अशा प्रमुख रेल्वे स्थानकावर ती थांबणार आहे. तर दुसऱ्या दिवशी आनंदवन एक्स्प्रेस काझीपेठ रेल्वे स्थानकावरून सुटून सीएसटीला पोहोचेल.