अनंत तरे यांचा अर्ज फेटाळला
By admin | Published: September 30, 2014 01:38 AM2014-09-30T01:38:32+5:302014-09-30T01:38:32+5:30
कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांना आव्हान देणा:या अनंत तरे यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
Next
>बंडही थंडावले : विधानपरिषद सदस्यत्वाचे उद्धव ठाकरे यांचे आश्वासन
ठाणो : कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांना आव्हान देणा:या अनंत तरे यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. दुसरीकडे पक्षाशी केलेल्या बंडखोरीचे
‘बक्षीस’ म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तरे यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्याचे आश्वासन दिले आहे. विधान परिषद सदस्यत्वाचे आश्वासन दिल्यामुळे नाराजी दूर झाल्याचे तरे यांनी सांगितले.
ठाणो शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने काँग्रेसमधून आयात केलेल्या रवींद्र फाटकांना उमेदवारी दिल्याने तरे नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी फाटक यांना आव्हान न देता, कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघातून थेट एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आणि भाजपामधून उमेदवारी अर्ज भरला. परंतु त्यांची नाराजी दूर करण्यासाठी रविवारी शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली होती.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे संकेत त्यांनी दिले होते. परंतु ही चर्चा करण्यापूर्वीच त्यांचे निवडणुकीतील आव्हान संपुष्टात आले.
अर्जाच्या छाननीत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. दरम्यान, अर्ज बाद झाल्यानंतर तरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. चर्चेअंती ठाकरे यांनी आपल्याला विधानपरिषदेची आमदारकी देण्याचे आश्वासन दिले, असे तरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
च्तरे यांनी 2.59ला अर्ज भरला होता. त्यांनी एबी फॉर्मच्या ङोरॉक्स प्रती जोडल्या होत्या. त्यांना मूळ एबी फॉर्म जोडा, असे सांगितले होते. शपथपत्रतील काही रकानेही रिकामेच सोडले होते.
च्त्यांचे नाव ठाणो शहर मतदारसंघात असल्याने या संदर्भातील नोंदणीचा उतारा त्यांच्याकडे मागितला होता. परंतु त्यांनी या तीनही बाबींची पूर्तता केली नव्हती. त्यामुळे छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला, असे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन गलांडे यांनी सांगितले
मी मूळ एबी फॉर्म आणला होता. परंतु निवडणूक निर्णय अधिका:यांनीच माङयाकडून ङोरॉक्स पत्र घेतली. त्यानंतर अर्धा तास ताटकळत ठेवले. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. त्यांच्या विरोधात न्यायालयातही जाणार आहे. - अनंत तरे