.. अन् आमराई परिसर झाला स्वच्छ

By admin | Published: July 23, 2014 11:29 PM2014-07-23T23:29:06+5:302014-07-23T23:29:06+5:30

बारामती शहरातील आमराई मागासवर्गीयांच्या नागरी वस्त्यांचा परिसरातील कच:याचे ढीग येथील सामाजिक कार्यकर्ते अमर धुमाळ आणि त्यांच्या सहका:यांच्या पुढाकारामुळे हा प्रभाग आज चकाचक झाला.

.. and Amrai area was clean | .. अन् आमराई परिसर झाला स्वच्छ

.. अन् आमराई परिसर झाला स्वच्छ

Next
बारामती : बारामती शहरातील आमराई मागासवर्गीयांच्या नागरी वस्त्यांचा परिसरातील कच:याचे ढीग येथील सामाजिक कार्यकर्ते अमर धुमाळ आणि त्यांच्या सहका:यांच्या पुढाकारामुळे हा प्रभाग आज चकाचक झाला. वाढत्या घाणीच्या साम्राज्यामुळे शेवटी युवावर्गालाच या प्रश्नी पुढाकार घ्यावा लागला. नागरिकांच्या आरोग्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे शहरातून कौतुक करण्यात आले. या स्वच्छता अभियानात 4 दिवसात जवळपास 25क् ट्रॉली कचरा उचलण्यात आला.   
मागासवर्गीच्या नागरी वस्त्यांमधील मुलभूत समस्यांबाबत ‘लोकमत’ने ‘आता बास.. बारामतीचा :हास’ या वृत्तमालीके अंतर्गत आवाज उठविला होता. या वृत्तमालिकेची दखल घेत. सामाजिक कार्यकर्ते अमर धुमाळ मित्र मंडळाच्या वतीने रविवार (दि.2क्) पासून बुधवार (दि. 23) र्पयत स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहिम राबविली. 
शहरातील आमराई परिसरात अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी कच:यांचे ढिग दिसून येत होते. उघडय़ा गटारींमध्ये कचरा अडकल्याने सांडपाणी देखील तुंबत होते. त्यामुळे याभागात डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी येथील नागरिकांना संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. आमराई परिसरात राहणा:या नागरिकांची भूयारी गटारींची मागणी अनेक दिवसांपसून प्रलंबीत आहे. या परिसरात काही भागात भूयारी गटारींसाठी सिमेंटचे पाईप आणले गेले आहेत. मात्र काम चालू न झाल्याने पाईप तसेच पडून आहेत. तसेच अंतर्गत रस्ते अतिक्रमणांच्या विळख्यात अडकले आहेत, तर काही ठिकाणी पिण्याचे पाणी देखील कच:यामुळे दूषीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 
‘लोकमत’ ने वारंवार मांडलेल्या या समस्यांची दखल घेत बारामती येथील सामाजिक कार्यकर्ते अमर धुमाळ यांनी शहरातील व आमराई परिसरातील कचरा उचलण्यासाठी जेसीबी यंत्र आणि दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने चार दिवसात शेकडो टन कचरा उचलला आहे. 
आमराई परिसरातील प्रबुध्दनगर, विठ्ठलनगर, सिध्दार्थनगर, भीमनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंद्रमणीनगर, शाहूनगर, महात्मा फुले नगर, प्रतिभानगर, वडार कॉलनी, वडकेनगर, गौतमनगर, कवी मोरोपंत विद्यालय परिसर, टी. सी. महाविद्यालय परिसर आदी भागातील कचरा या स्वच्छता मोहीमेतंर्गत साफ करण्यात आला. या स्वच्छता मोहीमेत अभिजीत पाटील, नितिन वाघमोडे, अभिजीत धुमाळ, अक्षय जगताप, निखिल जाधव, संदिप वेताळ, सुनील जाधव, भरत काळे, सुरज देशमाने, विशाल धुमाळ, शरद पांडूरंग पवार यांनी सहभाग घेतला.  दरम्यान, बारामती सर्व भागात दैनंदिन सार्वजनिक स्वच्छता राबविण्याची गरज आहे. त्याच बरोबर बारामती नगरपालिकेने स्वच्छेतेसाठी कंत्रटी कामगार घेतले आहेत. (प्रतिनिधी)
 
अभियांत्रिकेच्या विद्याथ्र्याचा सहभाग
या स्वच्छता मोहिमेत अभियांत्रिकीचे पदवीधर तरूण कार्यकत्र्यानी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामुळे आमराई परिसर चकाचक झाला आहे. नगरसेवक योगेश जगताप, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, उद्योजक जयेश पटेल, सचिन सातव यांनी  संघर्ष युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते नवनाथ बल्लाळ आणि त्यांच्या कार्यकत्र्यानी मोलाचे सहकार्य केले,अशी माहिती अमर धुमाळ यांनी दिली. 
 
अश्वासनांच्या पूर्ततेचा प्रशासनाला विसर
सततच्या घाणीमुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. अस्वच्छतेच्या समस्या आणि उघडय़ा गटारींमुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाणही वाढले आहे. या समस्यांबाबत येथील नागरिकांनी वारंवार नगरपालिका प्रशासनाला अर्ज विनंत्या केल्या होत्या. उपोषणाचा इशाराही दिला होता. मुख्याधिकारी रवी पवार यांच्या अश्वासनानंतर प्रबुध्दनगरमधील रहिवाशांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र या अश्वासनांची पुर्तता प्रशासन व मुख्याधिका:यांकडून अद्याप झाली नाही.
 
नागरिकांमध्ये समाधान..
कसबा श्रीरामनगर भागातील लेंडीनाल्याच्या लगत असलेल्या कच:यामुळे वृद्ध महिलेला डोळ्याचे विकार झाला होता. त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.  या वृद्धेने या भागातील कचरा उचलल्याने समाधान व्यक्त केले. या भागात सामाजिक कार्यकत्र्यानी सामाजिक जाणिव दाखवून राबवलेल्या स्वच्छता मोहीमेबाबत समाधान व्यक्त केले. मात्र नगरपालिकेनेही आपल्या जबाबदारीचे भान ठेवत या प्रभागातील स्वच्छतेच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात, अशी अपेक्षा येथील रहिवाशांनी व्यक्त केली. 
 
नागरिकांनी जबाबदारी ओळखावी
कचरामुक्त बारामतीसाठी घंटागाडय़ांद्वारे बारामती शहरातील कचरा संकलीत केला जातो. मात्र, नागरीकरण वाढत आहे. कचरा संकलीत करणा:या गाडय़ांची फे:या दिवसातून एकदाच होतात. त्यामुळे शहरात विविध भागात कचरा संकलीत करण्यासाठी प्लास्टिकच्या मोठय़ा कुंडय़ा पालिकेकडून पुरवल्या पाहिजे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येणा:या कच:याला पायबंद बसेल. याशिवाय नागरिकांनी देखील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून आरोग्याच्या समस्या निर्माण करू नयेत, असे आवाहन तरूण कार्यकत्र्यानी केले. 
 

 

Web Title: .. and Amrai area was clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.