...अन् २५ लाखांना चुना

By admin | Published: July 28, 2014 04:01 AM2014-07-28T04:01:25+5:302014-07-28T04:01:25+5:30

सहा महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फॉर्च्युन बेस कंपनीने मराठवाड्यातील गुंतवणुदारांची लाखोंची फसवणूक केली आहे

... and chose 25 lakhs | ...अन् २५ लाखांना चुना

...अन् २५ लाखांना चुना

Next

बीड : सहा महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फॉर्च्युन बेस कंपनीने मराठवाड्यातील गुंतवणुदारांची लाखोंची फसवणूक केली आहे. बीड शहरातील दहा जणांनी २५ लाख १० हजार रुपये गुंतविले आहेत.
फॉर्च्युन बेस कंपनीत पैसे गुंतवा, सहा महिन्यांत पैसे दुप्पट करुन देतो, विश्वास बसणार नाही म्हणून सहा महिन्यानंतरचा चेक व लातूर येथील प्लॉटची नोंदणी करुन देतो, असे अमिष दाखविल्याचे बीडचे बाळासाहेब बाजीराव शिंदे यांनी सांगितले. आम्हाला काही आठवडे दहा टक्के रक्कम देऊन विश्वास संपादित केला मात्र पाच महिन्यांतच कंपनीची वेबसाईट बंद पडली तर एंजट फरार झाले, अशी व्यथा शिंदे यांनी व्यक्त केली. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील भिमराव किसनराव मोरे व धुळे जिल्ह्यातील गोपाल लोटन पाटील (रा. साळवे) यांनी माझ्याशी फेबु्रवारी महिन्यात संपर्क केला. या दोघांनी मुंबई येथे अंधेरी (प) मध्ये कंपनीचे कार्यालय असल्याचे सांगितले. त्यानंतर मी फॉर्च्युन बेस कंपनीत तीन टप्प्यांत पाच लाखांची गुंतवणूक केली, अशी माहितीही शिंदे आहे. मात्र मोरे व पाटील यांचा संपर्क झाला नाही.

Web Title: ... and chose 25 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.