...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, फायरब्रँड, दिठी, आम्ही दोघी यांना नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 06:44 AM2019-04-13T06:44:14+5:302019-04-13T06:44:18+5:30

५६ वा राज्य मराठी चित्रपट महोत्सव : प्राथमिक फेरीची नामांकने, पुरस्कार घोषित

... and Dr. Kashinath Ghanekar, Firebrand, Dhi, we both nominated | ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, फायरब्रँड, दिठी, आम्ही दोघी यांना नामांकन

...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, फायरब्रँड, दिठी, आम्ही दोघी यांना नामांकन

Next

मुंबई : ५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन नामांकनांची शिफारस तसेच सात तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके शुक्रवारी घोषित करण्यात आली आहेत.


अंतिम फेरीसाठी दिठी, भोंगा, ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, फायरब्रँड, बंदिशाळा, आम्ही दोघी, एक सांगायचंय, अनसेड हार्मोनी, तेंडल्या, भूर्जी, चुंबक या दहा चित्रपटांचे उत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ६६ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका ५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीच्या १४ तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून परीक्षण करण्यात आले. दरम्यान, नामांकनासाठी उत्कृष्ट विनोदी अभिनेता व अभिनेत्री या विभागाकरिता शिफारस आलेली नाही.


घोषित पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी नरेंद्र हळदणकर (बंदिशाळा), उत्कृष्ट छायालेखनासाठी सुधीर पळसाने (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट संकलनासाठी नचिकेत वाईकर (तेंडल्या), उत्कृष्ट ध्वनिमुद्रणासाठी गंधार मोकाशी (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट ध्वनी संयोजनासाठी मंदार कमलापूरकर (पुष्पक विमान), उत्कृष्ट वेशभूषासाठी चैत्राली गुप्ते (एक सांगायचंय अनसेड हार्मोनी), उत्कृष्ट रंगभूषासाठी विक्रम गायकवाड (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट बालकलाकारासाठी श्रीनिवास पोकळे (नाळ) आणि अमन कांबळे (तेंडल्या) यांना पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून संबंधित चित्रपटांचे परीक्षण केले जाईल. हे पुरस्कार २६ मे २०१९ रोजी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येतील.

Web Title: ... and Dr. Kashinath Ghanekar, Firebrand, Dhi, we both nominated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.