अन् फुलली मोसंबीची बाग

By admin | Published: September 14, 2014 01:32 AM2014-09-14T01:32:26+5:302014-09-14T01:32:26+5:30

शिक्षण, उद्योगासह कृषी क्षेत्रतही जिल्हा मागासलेला असल्याचा बाऊ नेहमीच जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार करतात.

And the flower garden of Mussambi | अन् फुलली मोसंबीची बाग

अन् फुलली मोसंबीची बाग

Next
गोपाल लाजुरकर ल्ल गडचिरोली
शिक्षण, उद्योगासह कृषी क्षेत्रतही जिल्हा मागासलेला असल्याचा बाऊ नेहमीच जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार करतात. शेती विकासासाठी जिल्ह्यात जलव्यवस्थापन, सिंचन व इतर संसाधनाच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, असा कांगावा नेहमीच केला जातो. फळबागांसाठी पोषक वातावरण नसल्याचे कारणसुद्धा दाखविले जाते. परंतु धानोरासारख्या अतिदुर्गम भागातील जेवलवाही येथे वामन सावसागडे या शेतक:याने पावसाचे पाणी शेतात मुरवून मोसंबीची बाग फुलविली आहे. 
वडिलोपाजिर्त शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेले वामनराव सावसाकडे हे मुळात चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील जामसाडा येथील रहिवासी. शेतीत काम असतानाच त्यांनी उच्च शिक्षण घेऊन विस्तार अधिकारी म्हणून नोकरी मिळविली. परंतु शेतीशी असलेला जिव्हाळा कायम होता. नोकरी करीत असतानाही शेती व्यवसाय करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी धानोरा तालुक्यातील जेवलवाही येथे 1992मध्ये 1क् एकर शेती खरेदी केली. शेताला प्राथमिक गरज असणारी पाण्याची सोय करण्यासाठी शेतात दोन विहिरी खोदल्या. या विहिरींना भरपूर पाणी लागल्यामुळे त्यांचा उत्साह दुणावला. पावसाचे पाणी वाहून वाया जाऊ नये म्हणून शेतात बांध घातले. पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरावे व संकट काळात पिकांना पाणी मिळावे म्हणून 1क् एकर क्षेत्रत दोन एकरांचा एक व एक एकर क्षेत्रचे पाणी साठवणीचे छोटे तलाव (शेततळे) तयार केले. उताराला असलेल्या शेततळ्यात उंच-सखल भागातून पावसाळ्यात वाहून जाणारा गाळ जमा होण्याची व्यवस्था केली. या गाळाचा उन्हाळ्यात उपसा करून पुन्हा शेतात पसरविला जातो. त्यामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होत नाही. रासायनिक खतांच्या वापरापेक्षा सुपीक गाळ पिकांच्या संवर्धनासाठी अधिक महत्त्वाची भूमिका बजावितो. याप्रमाणो त्यांनी पावसाचे पाणी व गाळ यांचे योग्य व्यवस्थापन करून धान पिकासह मोसंबीची बाग फुलवली. जमिनीचा पोत कायम राहावा म्हणून पावसाच्या सुरुवातीला बोरू, धैंचा आदी हिरवळीच्या वनस्पतींची लागवड करून वनस्पतीवर फुलोरा येण्याच्या काळात त्या जमिनीत गाडल्या जातात. त्यामुळे शेतात उत्कृष्ट खताची निर्मिती होते. त्यामुळेच शेताच्या सुपीकतेत वाढ होऊन जमिनीची पाणी ग्रहण करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
 
वृक्षतोडीमुळे जमिनी ओस पडत आहेत. परिणामी पावसाचे प्रमाण झपाटय़ाने कमी होत आहे. याचा परिणाम शेतीवर होऊन उत्पादन घटत आहे. पावसाचे पाणी वापराशिवाय वाहून जाते. शेतात जलसाठे निर्माण करून पाणी जमिनीत मुरविल्यास जमिनीची पाणी ग्रहण क्षमता वाढेल व शेतीलाही फायदा होईल.
- वामन सावसाकडे, शेतकरी, जेवलवाही, ता. धानोरा
 
पोत कायम राहण्यासाठी. जमिनीचा पोत कायम राहावा म्हणून पावसाच्या सुरुवातीला बोरू, धैंचा आदी हिरवळीच्या वनस्पतींची लागवड करून वनस्पतीवर फुलोरा येण्याच्या काळात त्या जमिनीत गाडल्या जातात. त्यामुळे शेतात उत्कृष्ट खताची निर्मिती होते. त्यामुळेच शेताच्या सुपीकतेत वाढ होऊन जमिनीची पाणी ग्रहण करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते, असे सावसाकडे यांनी सांगितले.
 
च्सावसाकडे यांनी एक एकर शेतीत सहा बाय सहा मीटर अंतरावर न्यूसेलर जातीच्या मोसंबीची लागवड केली आहे.   कृषितज्ज्ञांचा सल्ला तसेच कीडरोग नियंत्रण व व्यवस्थापनामुळे सद्य:स्थितीत मोसंबीची 85 झाडे जिवंत आहेत. झाडांवर खोडकीड अथवा अन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ 
नये म्हणून जून व नोव्हेंबर महिन्यात झाडांना बोडरेपेस्ट लावली जाते.
 
च्झाडाभोवतीच्या आळ्यात शेणखत मिसळविले जाते. योग्य व्यवस्थापनामुळे ते दरवर्षी सरासरी साडेतीन टन मोसंबीचे उत्पादन घेत आहेत. बाजारातही मोसंबीला 
5क् रूपये प्रति किलो भाव मिळत असल्याने व्यापारी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. 

 

Web Title: And the flower garden of Mussambi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.