... अन् जखमी वासरं 'माणुसकी'नं भारावली !
By admin | Published: August 10, 2016 04:24 PM2016-08-10T16:24:55+5:302016-08-10T16:24:55+5:30
भाकड गायी अन निरूपयोगी वासरे रस्त्यावर बेवारस सोडण्याच्या घटना वाढत आहेत. वाई येथील औद्योगिक वसाहतीत मोकाट कुत्र्यांनी अशाच दोन बेवारस
ऑनलाइन लोकमत
वाई ( सातारा), दि. 10 - भाकड गायी अन निरूपयोगी वासरे रस्त्यावर बेवारस सोडण्याच्या घटना वाढत आहेत. वाई येथील औद्योगिक वसाहतीत मोकाट कुत्र्यांनी अशाच दोन बेवारस वासरांचे अक्षरश: लचके तोडले. तेव्हा, घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखून वासराचे प्राण वाचविले. आता या वासरांना करुणा मंदिर गोशाळेच्या रुपाने हक्काचा निवारा मिळाला आहे.
वाई शहरात भाकड जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बसस्थानक परिसरासह वसाहतींमध्ये जनावरांचा नेहमीच वावर असतो. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असाच एक प्रसंग उद्भवला. दोन बेवारस वासरांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात दोन्ही जनावरं गंभीररीत्या जखमी झाली. वासरांच्या केविलवाण्याओरडण्याचा आवाज ऐकून सुनील पानसे, दिनेश भुजबळ, नंदकुमार जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी जीव धोक्यात घालून पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तावडीतून बिचाऱ्या जखमी वासरांची सुटका केली.
तालुका पशुधन अधिकारी डॉ़ सुनील देशपांडे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर गो-रक्षक दलाचे कार्यकर्ते स्वप्नील भिलारे, ऋषी द्गडे, तृप्तेश लांजेकर, ऋशीराज जगताप यांनी जखमी वासरांची वेळे येथील 'करुणा मंदिर गोशाळे'त रवानगी केली. अखेर मृत्यूच्या दाढेतून वासरे गो शाळेत जाऊन विसावली.