...तर केरोसिन परवाने रद्द करण्यात येणार

By admin | Published: May 19, 2016 05:57 AM2016-05-19T05:57:27+5:302016-05-19T05:57:27+5:30

पाच वर्षे वा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून नूतनीकरण न झालेले घाऊक, हॉकर्स व किरकोळ केरोसिन परवाने आता रद्द करण्यात येणार आहेत.

... and the Kerosene licenses will be canceled | ...तर केरोसिन परवाने रद्द करण्यात येणार

...तर केरोसिन परवाने रद्द करण्यात येणार

Next


मुंबई : पाच वर्षे वा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून नूतनीकरण न झालेले घाऊक, हॉकर्स व किरकोळ केरोसिन परवाने आता रद्द करण्यात येणार आहेत. या परवान्यांच्या नूतनीकरणाचे नवीन नियम अन्न व नागरी पुरवठा विभागाने आज जारी केले.
केरोसिन परवाना नूतनीकरण पद्धतीत आता सुधारणा करण्यात आल्या आहेत. केरोसिन परवान्याची मुदत ज्या वर्षी समाप्त होत आहे त्या वर्षी ३१ डिसेंबरपूर्वी नूतनीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपूर्वी नूतनीकरण न केलेल्या परवान्यावर १ जानेवारीपासून प्रत्यक्ष नूतनीकरण होईपर्यंत कोणताही केरोसिन कोटा देण्यात येणार नाही.
केरोसिन परवाना नूतनीकरणास झालेल्या विलंबास शासकीय अधिकारी/कर्मचारी जबाबदार आढळल्यास तसेच परवाना नूतनीकरण केलेले नसतानाही त्यावर केरोसिन कोटा सुरू ठेवल्यास संबंधित अधिकारी/ कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.
नूतनीकरणासतील विलंबास परवानाधारक जबाबदार असल्यास अनामत रक्कम जप्त करून तसेच दंडाची रक्कम आकारून पुन्हा नव्याने अनामत रक्कम आकारण्याची पद्धत आहे. या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, घाऊक परवानाधारकाकडून दरदिवशी ४०० रुपये दंड आकारला जाईल. किरकोळ व हॉकर्सच्या परवानाधारकांना दरदिवशी २० रुपये दंड लावला जाईल.
राज्यात केरोसिनचे ५६ हजार ५३५ किरकोळ परवाने आहेत. घाऊक परवान्यांची संख्या ७८६ इतकी असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: ... and the Kerosene licenses will be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.