...आणि पोलीस ठाण्यावर मृतदेहासह काढला मोर्चा

By Admin | Published: November 16, 2016 09:10 PM2016-11-16T21:10:27+5:302016-11-16T21:15:53+5:30

ऑनलाइन लोकमत वसई, दि. १६ - सोनू झा या तरुणाच्या मारेकऱ्यांवर कारवाई करावी यासाठी संतप्त जमावाने विरार पोलीस ठाण्यावर ...

... and the police station, along with the dead, took out the dead body | ...आणि पोलीस ठाण्यावर मृतदेहासह काढला मोर्चा

...आणि पोलीस ठाण्यावर मृतदेहासह काढला मोर्चा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
वसई, दि. १६ - सोनू झा या तरुणाच्या मारेकऱ्यांवर कारवाई करावी यासाठी संतप्त जमावाने विरार पोलीस ठाण्यावर मृतदेहासह मोर्चा नेला होता. त्यावेळी अचानक बिथरलेल्या मोर्चेकऱ्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला. जमावाने पोलीस ठाण्यात तोडफोड करीत पोलिसांना धक्काबुक्की केली. तसेच वसई विरार पालिका परिवहन ची एक बस आणि दोन रिक्षांची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला.
विरार येथील सहकार नगरात दिवाळीत फटाके वाजवणावरुन झालेल्या मारहानीत  जखमी झालेल्या सोनू झा या तरुणाचा आज उपचारा दरम्यान मृत्यु झाला. मोकाट आरोपिना अटक करा या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी रुग्नवाहिकेसह मृतदेह पोलिस ठाण्यात आणून एकच हल्लाबोल केला.

सोनू झा प्रकरणी विरार पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करुन 5 आरोपीना अटक करण्यात आली होती. काही जण जामिनावर सुटले आहेत. होता. आरोपी सुटलेच कसे त्याना तात्काळ अटक करा ही मागणी करीत नागरिकांनी विरार पोलिस ठाण्यात मृतदेह नेऊन हल्लाबोल केला.वसई तालुक्यातील सर्व पोलिस फौजफाटा एकत्र केला असून कायदा आणि सुव्येवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रि उशिरा पर्यत तोडगा काढणे सुरूच होते. या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी यासाठी जमाव पोलीस ठाण्यावर सोनूचा मृतदेह देऊन आला होता.

https://www.dailymotion.com/video/x844i5p

Web Title: ... and the police station, along with the dead, took out the dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.