अन् रापमची एकही लालपरी धावलीच नाही, बस स्थानकात स्मशान शांतता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 12:32 PM2017-10-17T12:32:28+5:302017-10-17T12:34:00+5:30
एसटी कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी संबंधीतांना निवेदने दिलीत. परंतु, अद्यापही मागण्यांची पूर्तता न झाल्याचा ठपका ठेवत मंगळवार १७ आॅक्टोबरपासून रापमच्या कामगारांनी बेमुदत संप आंदोलन सुरू केले.
वर्धा : एसटी कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी संबंधीतांना निवेदने दिलीत. परंतु, अद्यापही मागण्यांची पूर्तता न झाल्याचा ठपका ठेवत मंगळवार १७ आॅक्टोबरपासून रापमच्या कामगारांनी बेमुदत संप आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे मंगळवारी जिल्ह्यात दुपारपर्यंत एकही बस धावली नाही. याचा नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.
येत्या काही दिवसात प्रलंबित मागण्या निकाली न काढल्यास १७ आॅक्टोबर पासून एसटी कामगार बेमुदत संप आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले होते. शासकीय व इतर क्षेत्रातील कर्मचाºयांपेक्षा एसटी कर्मचाºयांचे वेतन फारच कमी असून ते अल्प वेतनात नागरिकांना सुविधा देत आहेत. त्यांना समाधानकारक वेतन देण्यात यावे, १ जुलै २०१६ पासून देय होणारा ७ टक्के वाढीव महागाई भत्ता शासकीय कर्मचाºयांना लागू करून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होवूनही रा.प. कर्मचाºयांना तो अद्यापही लागू करण्यात आला नाही. रापमच्या कर्मचाºयांना महागाई भत्ता लागू करण्यात यावा, कामगारांच्या हिताचा असलेला वेतन करार करण्यास चालढकल करीत होत असून तो करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. सदर संपाला महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस इंटक महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना, विदर्भ एस. टी. कामगार संघटना, संघर्ष ग्रुप आदी संघटनी पाठींबा दिला असून आंदोलनात जिल्ह्यातील एकूण १६६२ कामगार सहभागी झाले होते.
बस स्थानकात स्मशान शांतता
मध्यरात्रीपासून रामपच्या कामगारांनी बेमुदत संप आंदोलन सूरू केले. या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाची एकही बस जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा बसस्थानकावर पोहोचली नाही. ऐरवी विद्यार्थी व प्रवाशांनी गजबजून राहणाºया वर्धा बसस्थानकावर आज स्मशान शांतता होती.
विद्यार्थ्यांची झाली गोची
जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरात परिसरातील गावांमधील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. इतकेच नव्हे तर नोकरीनिमित्तही वर्धेत येणाºयांची संख्या बºयापैकी आहे. परंतु, मंगळवारी रापमच्या कर्मचाºयांच्या संप आंदोलनामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गोची झाली होती.
छोट्या व्यावसायिकांना फटका
जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात खाद्यपदार्थ विक्री करून अनेक नागरिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु, आजच्या संप आंदोलनामुळे खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाºयांसह ओटो चालकांना फटका सहन करावा लागला.