...मग बकरी ईददरम्यान भाजी विक्रीवर बंदी घालणार का - ओवेसी

By admin | Published: September 8, 2015 02:32 PM2015-09-08T14:32:29+5:302015-09-08T16:46:13+5:30

मुंबईमध्ये मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय हा निरर्थक व मुर्खपणाचा निर्णय असून मग आता बकरी ईद दरम्यान भाजीविक्रीवर बंदी घालणार का असा खोचक सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपाला विचारला आहे.

... and then ban the sale of vegetables during the goat Id - Owaisi | ...मग बकरी ईददरम्यान भाजी विक्रीवर बंदी घालणार का - ओवेसी

...मग बकरी ईददरम्यान भाजी विक्रीवर बंदी घालणार का - ओवेसी

Next
>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ८ - पर्युषणादरम्यान मुंबईमध्ये मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय हा निरर्थक व मुर्खपणाचा निर्णय असून मग बकरी ईद दरम्यान भाजीविक्रीवर बंदी घालणार का असा खोचक सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपाला विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचा निर्णय फेटाळून लावावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. 
जैन धर्मीयांच्या पर्युषणादरम्यान मुंबईत चार तर मीरा भाईंदरमध्ये आठ दिवसासांठी मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेच्या निर्णयाविरोधात भाजपावर टीकेची झोड उठली असून शिवसेना, मनसे या पक्षांनीही या निर्णयाचा विरोध केला आहे. आता एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनीदेखील या वादात उडी घेतली आहे. मांसविक्रीवरील बंदीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ओवेसी म्हणाले, धर्म एवढा महत्त्वाचा असेल तर बकरी ईददरम्याना मटण वाटले पाहिजे व भाजीविक्रीवर बंदी टाकायला हवी, हे तुम्हाला सहन होईल का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असून अशा शहरात मांसविक्रीच्या व्यवसायावर बंदी घालणे योग्य नाही. हा फक्त मुस्लिमांचा विषय नसून याला आर्थिक दृष्टीकोनातून बघितले पाहिजे. मांसविक्रीवर अवलंबून असलेले कामगार या कालावधीत उदारनिर्वाह कसा करणार असा प्रश्न त्यांनी सत्ताधा-यांना विचारला. 
 
मांसबंदीमुळे ट्विटरवरही संताप
दरम्यान मीटबॅनच्या या निर्णयावर सोशल मीडियावरही संताप व्यक्त होत असून ट्विटरवर तर  #meatban हा हॅशटॅग आज टॉप ट्रेंडिग विषय ठरला आहे. सामान्य जनतेसह सोनम कपूरसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही या बंदीविरोधात आवाज उठवत निषेध नोंदवला असून आहे. काही ट्विटरकरांनी तर मुंबईचा उल्लेख 'बॅनि'स्तान असा केला आहे असून काहींनी भाजप म्हणजे 'भारतीय जैन पार्टी' असल्याचे म्हटले आहे. 
 
'आपला देश अजूनही तिस-या जगातच वावरत आहे, मांसबंदीने आपल्या संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडले आहे' अशी टीका अभिनेत्री सोनम कपूरने केली आहे. तर एका धर्माचे पावित्र्य जपण्यासाठी अन्य धर्मीय मांसाहार सोडत असतील तर मग इतर धर्मीयांसाठी साकाहीर मंडळी मांस खातील का असा सवाल एका ट्विटरकराने केला आहे. ' बीफ बंदी, मांस बंदी, राजकारण्यांवर टीका करण्यास बंदी, एकमेकांस भेटण्यास बंदी.. वेलकम टू मुंबई ..'बॅनि'स्तानची राजधानी' अशा शब्दांत ट्विटरवरील एका महिलेने आपला संताप नोंदवला आहे. 'आम्हाला हॉस्पिटल्स, स्वच्छतागृहे, चांगले रस्ते, रेल्वे किंवा सुरक्षा या प्रश्नांबद्दल काळजी नाही. पण तुम्ही काय बघता आणि काय खाता यातच आम्हाला रस आहे' असे ट्विटही एका व्यक्तीने केले आहे.
 

Web Title: ... and then ban the sale of vegetables during the goat Id - Owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.