...तर महापालिकेच्या आवारात खड्डे खोदू, प्रहार संघटनेचा इशारा
By admin | Published: August 13, 2016 05:02 PM2016-08-13T17:02:21+5:302016-08-13T17:02:21+5:30
कावड यात्रेपूर्वी या मार्गांवरील खड्डे बुजवा, अन्यथा महानगर पालिकेच्या आवारात खड्डे खोदू, असा इशारा देत प्रहार संघटनेने शनिवारी कावड मार्गावर अभिनव आंदोलन केले
Next
>- ऑनलाइन लोकमत
पालखी मार्गावरील खड्डे बुजवा : प्रहारचे अभिनव आंदोलन
अकोला, दि. 13 - संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला अकोला शहरातील कावड यात्रा महोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु ज्या मार्गांवरून कावड यात्रा काढली जाते, त्या मार्गांवर प्रचंड खड्डे आहेत. त्यामुळे कावड यात्रेपूर्वी या मार्गांवरील खड्डे बुजवा, अन्यथा महानगर पालिकेच्या आवारात खड्डे खोदू, असा इशारा देत प्रहार संघटनेने शनिवारी कावड मार्गावर अभिनव आंदोलन केले.
श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोला शहरात कावड महोत्सव साजरा केला जातो. शहरातील हजारो शिवभक्त नजीकच्या गांधीग्राम येथील पुर्णा नदीचे पाणी कावडद्वारे आणून राजराजेश्वराला जलाभिषेक करतात. गांधीग्राम येथून शिवभक्तांची कावड यात्रा ज्या मार्गाने शहरात प्रवेश करते त्या मार्गावर प्रचंड खड्डे पडलेले आहेत. खांद्यावर कावडचा भार व रस्त्यावर खड्डे अशा स्थितीत पायी प्रवास करणा-या शिवभक्तांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
टिळक मार्गासह शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झालेले असताना, स्थानिक प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कावड महोत्सवापूर्वी कावड मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावे. तसे न झाल्यास प्रहार संघटना महापालिकेच्या आवारात खड्डे खोदेल, असा इशारा संघटनेने मनपा आयुक्तांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, शनिवारी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी टिळक मार्गावरील खड्ड्यांना मार्किंग करून अभिनव आंदोलन केले. यावेळी शहर अध्यक्ष मनोज पाटील, सोपान कडाळे, परेश पाटील, योगेश ढोरे, रोहित गावंडे, सिद्धार्थ सदांशिव, मंगेश गणेशकर, ऋषी गावंडे, प्रभाकर वानखडे, हरिष बोंडे, प्रशांत झाडे, धिरज बुलबुले, सुरज धायडे, शुभम वाकोडे, चेतन तोडकर, गोपाल गावंडे, शुभम ठाकूर, धिरज पुंडकर, तुषार उज्जैनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.