...आणि योगींनी "जय महाराष्ट्र"ने केली भाषणाची सुरूवात
By admin | Published: May 2, 2017 06:41 PM2017-05-02T18:41:56+5:302017-05-02T19:18:34+5:30
कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणाची सुरूवात जय महाराष्ट्र या शब्दांनी केली. इतकंच नाही तर...
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 2 - उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महाराष्ट्र दिनानिमीत्त एका दोन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. येथील राजभवनात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
सोमवारी महाराष्ट्रात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडत असताना योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशातही महाराष्ट्र दिन साजरा झाला. यावेळी उत्तर प्रदेश सरकारमधील अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातून सांगलीचे खासदार संजयकाका पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणाची सुरूवात जय महाराष्ट्र या शब्दांनी केली. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीची काही वाक्यंही मराठीतूनच म्हटली. त्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केला. यावेळी योगींनी मराठी समाजाच्या योगदानाचा उल्लेख केला.
प्रत्येक राज्याला त्याची अस्मिता, संस्कृती जपण्यासाठी असा दिवस साजरा करण्याची आवश्यकता आहे असं राज्यपाल राम नाईक यांचा आग्रह होता. याआधी त्यांनी अखिलेश सरकारलाही अशी विनंती केली होती. मात्र त्यावेळी दुर्लक्षित राहिलेली ही मागणी योगींनी मात्र तातडीने पूर्ण केली.
महाराष्ट्र दिनाच्या या कार्यक्रमानंतरच आज योगींनी यापुढे उत्तर प्रदेश दिवस साजरा करण्याचीही घोषणा केली. 24 जानेवारी रोजी उत्तर प्रदेश दिन साजरा केला जाल अशी घोषणा त्यांनी केली.