...आणि तरुणाला आली शेपटी
By admin | Published: October 3, 2016 10:13 PM2016-10-03T22:13:45+5:302016-10-03T22:13:45+5:30
ऐकावे ते नवलच अशी प्रतिक्रिया उमटावी असे प्रकरण नागपुरात उघडकीस आले. एका तरुणाला तब्बल १८ सेंटीमीटर शेपूट
Next
id="yui_3_16_0_ym19_1_1475503632162_42341">योगेश पांडे/ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 3- ऐकावे ते नवलच अशी प्रतिक्रिया उमटावी असे प्रकरण नागपुरात उघडकीस आले. एका तरुणाला तब्बल १८ सेंटीमीटर शेपूट होते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी यांच्या नेतृत्वातील चमूने सोमवारी यशस्वी शस्त्रक्रिया करून हे शेपूट वेगळे केले. माणसाला एवढे लांब शेपूट असण्याचे हे जगातील पहिलेच प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी कोणालाही १० सेमीपेक्षा जास्त लांबीचे शेपूट नव्हते.
डॉ. गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्माला येणा-या बाळाला जनुकीय दोषामुळे शेपटी येते. असे बाळ जन्माला येण्याचे प्रमाण ०.२५ टक्के आहे. यापूर्वी कोणालाही १० सेमीपेक्षा जास्त लांबीचे शेपूट आढळून आले नाही. नागपुरातच पहिल्यांदा एवढ्या लांबीच्या शेपटाचा मुलगा आढळून आला. शेपूट वेगळे करण्यासाठी दीड तास शस्त्रक्रिया करण्यात आली.