Andheri East By Election Result Update: लटके वि. नोटा! अंधेरीत वेगळाच सामना रंगला; भाजपाने 'गेम' खेळला?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 10:41 AM2022-11-06T10:41:40+5:302022-11-06T10:42:34+5:30

Rutuja Latke Vote Count: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठी आघाडी मिळाली आहे. परंतू नोटाला पडलेल्या मतांनी देखील लक्ष वेधले आहे.

Andheri East By Election Result, Shiv sena Rutuja Latke Update: A different match took place in Andheri; Did BJP play a 'game'? | Andheri East By Election Result Update: लटके वि. नोटा! अंधेरीत वेगळाच सामना रंगला; भाजपाने 'गेम' खेळला?

Andheri East By Election Result Update: लटके वि. नोटा! अंधेरीत वेगळाच सामना रंगला; भाजपाने 'गेम' खेळला?

Next

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून तिथे वेगळाच सामना रंगला असल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आघाडीवर आहेत. असे असले तरी दुसऱ्या क्रमांकाची मते अपक्षांपेक्षा नोटालाच जास्त असल्याने राजकीय वर्तुळात भाजपाची चर्चा सुरु झाली आहे. भाजपा आणि शिंदे गटाकडून नोटाला मतदान करण्याचा प्रचार करण्यात आल्याचा आरोप लटकेंनी केला होता.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठी आघाडी मिळाली आहे. परंतू नोटाला पडलेल्या मतांनी देखील लक्ष वेधले आहे. पहिल्या फेरीत ऋतुजा लटके यांना ४२७७ मते मिळाली आहेत. तर नोटाला त्यापाठोपाठ ६२२ मते मिळाली आहेत. तर बाला नाडार - 222, मनोज नाईक - 56, मीना खेडेकवर- 138, फरहान सय्यद- 103, मिलिंद कांबळे- 79, राजेश त्रिपाठी- 127 एवढी मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या फेरीत लटके यांना एकूण ७८१७ मते मिळाली. या फेरीतही लटके यांना आघाडी मिळाली आहे. अंधेरीत सात उमेदवार रिंगणार आहेत. दुसऱ्या फेरीपर्यंत नोटाला १४७० मते मिळाली आहेत.

तिसऱ्या फेरीअखेर नोटाला २९६७ मते, तर ऋतुजा लटकेंना ११३६१ मते मिळाली. नोटाचा प्रभाव चौथ्या फेरीतही दिसून आला. चौथ्या फेरीअखेर नोटाला ३६८० मते. ऋतुजा लटकेंना १४६४८ मते मिळाली आहेत. 

पाचव्या फेरीअखेर ऋतुजा लटकेंना १७२७८ मते. नोटाला ३८५९ मते मिळाली आहेत. 

चौथ्या फेरीअखेर झालेली मतमोजणी :

१) ऋतुजा लटके- १४६४८

२) बाला नाडार - ५०५

३) मनोज नाईक - ३३२

४) मीना खेडेकर- ४३७

५) फरहान सय्यद- ३०८

६) मिलिंद कांबळे- २४६

७) राजेश त्रिपाठी- ४९२

नोटा -३५८०

एकूण मते : २०५४८

 

पाचव्या फेरीअखेर झालेली मतमोजणी :

१) ऋतुजा लटके- १७२७८

२) बाला नाडार - ५७०

३) मनोज नायक - ३६५

४)  नीना खेडेकर- ५१६

५) फरहाना सय्यद- ३७८

६) मिलिंद कांबळे- २६७

७) राजेश त्रिपाठी- ५३८

आणि 

नोटा -३८५९

एकूण मते : २३७७१

Web Title: Andheri East By Election Result, Shiv sena Rutuja Latke Update: A different match took place in Andheri; Did BJP play a 'game'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.