Andheri East By Election Result Update: नोटाचा प्रभाव ओसरू लागला! सहाव्या फेरीत ऋतुजा लटकेंच्या मतांमध्ये मोठा फरक पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 11:16 AM2022-11-06T11:16:21+5:302022-11-06T11:17:00+5:30

Andheri East By Election Result Update Live: शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यामागोमाग नोटाला मते मिळत असल्याने भाजपाने केलेला तो कथित प्रचार कारणीभूत असल्याची चर्चा सुरु झाली होती.

Andheri East By Election Result Update Live: The effect of the note started fading! big difference in the votes of Rituja Latke in the sixth round Shivsena | Andheri East By Election Result Update: नोटाचा प्रभाव ओसरू लागला! सहाव्या फेरीत ऋतुजा लटकेंच्या मतांमध्ये मोठा फरक पडला

Andheri East By Election Result Update: नोटाचा प्रभाव ओसरू लागला! सहाव्या फेरीत ऋतुजा लटकेंच्या मतांमध्ये मोठा फरक पडला

googlenewsNext

अंधेरी पोटनिवडणुकीत नोटाने सुरुवातीला खळबळ उडवून दिली होती. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यामागोमाग नोटाला मते मिळत असल्याने भाजपाने केलेला तो कथित प्रचार कारणीभूत असल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतू, आता नोटाचा प्रभाव ओसरू लागला असून लटकेंची आघाडी वाढू लागली आहे. 

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठी आघाडी मिळाली आहे. परंतू नोटाला पडलेल्या मतांनी देखील लक्ष वेधले आहे. पहिल्या फेरीत ऋतुजा लटके यांना ४२७७ मते मिळाली आहेत. तर नोटाला त्यापाठोपाठ ६२२ मते मिळाली आहेत. तर बाला नाडार - 222, मनोज नाईक - 56, मीना खेडेकवर- 138, फरहान सय्यद- 103, मिलिंद कांबळे- 79, राजेश त्रिपाठी- 127 एवढी मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या फेरीत लटके यांना एकूण ७८१७ मते मिळाली. या फेरीतही लटके यांना आघाडी मिळाली आहे. अंधेरीत सात उमेदवार रिंगणार आहेत. दुसऱ्या फेरीपर्यंत नोटाला १४७० मते मिळाली आहेत.

तिसऱ्या फेरीअखेर नोटाला २९६७ मते, तर ऋतुजा लटकेंना ११३६१ मते मिळाली. नोटाचा प्रभाव चौथ्या फेरीतही दिसून आला. चौथ्या फेरीअखेर नोटाला ३६८० मते. ऋतुजा लटकेंना १४६४८ मते मिळाली आहेत. पाचव्या फेरीअखेर ऋतुजा लटकेंना १७२७८ मते. नोटाला ३८५९ मते मिळाली आहेत.

सहाव्या फेरीमध्ये ऋतुजा लटके यांना २१०९० मते मिळाली आहेत. तर नोटाला ४३३८ मते मिळाली आहेत. हा फरक आता १६७५२ मतांचा झाला आहे. यावर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपाने नोटाला मत देण्याचा प्रचार केला. नोटाला पडलेली ही मते भाजपाची आहेत, असा दावा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा आहे. 

सातव्या फेरीअखेर लटके यांना २४९५५ मते मिळाली आहेत. तर नोटाला ४७१२ मते मिळाली आहेत. सुरुवातीला ६००-८०० मतांची प्रत्येक फेरीला मते वाढणाऱ्या नोटाला आता ३०० च्या आसपास मते पडू लागली आहेत. 

Web Title: Andheri East By Election Result Update Live: The effect of the note started fading! big difference in the votes of Rituja Latke in the sixth round Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.