Andheri East By Election Result Update: अंधेरीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटणार? थोड्याच वेळात मतमोजणी; कोण जिंकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 07:56 AM2022-11-06T07:56:50+5:302022-11-06T07:59:59+5:30

Andheri East By Election Result Live: अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांनी निवडणूक लढविली आहे.

Andheri East By Election Result Update: Seven seats in six states! Counting of votes for Andheri by-election today; Udddhav Thackeray's Shivsena Rutuja Latke will win? | Andheri East By Election Result Update: अंधेरीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटणार? थोड्याच वेळात मतमोजणी; कोण जिंकणार?

Andheri East By Election Result Update: अंधेरीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटणार? थोड्याच वेळात मतमोजणी; कोण जिंकणार?

Next

देशभरातील सहा राज्यांतील सात विधानसभा सीटवर पोटनिवडणूक झाली आहे. आज यावर मतमोजणी असणार असून तीन भगवा दल, दोन काँग्रेस आणि एक शिवसेना आणि राजद अशा पक्षांकडे असलेले मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रात अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूकीचे मतदान झाले असून थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदान कमी प्रमाणात झाल्याने ठाकरे गटाची धाकधुक वाढली आहे. 

बिहारमध्ये भाजपा वि. राजद, हरियाणामध्ये भगवा दल वि. काँग्रेस, तेलंगानामध्ये भाजपा वि. टीआरएस, उत्तर प्रदेशमध्ये सपा वि. भाजपा, ओडिशामध्ये बिजद वि. भाजपा असा मुकाबला आहे. 
बिहार विधानसभेच्या मोकामा आणि गोपालगंज मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार आहे. या दोन जागांसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते, त्यात ५२.३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. माजी मुख्यमंत्री भजनलाल यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघाचाही समावेश आहे. 

अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३१.७४ टक्के मतदान झाले आहे. अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांनी तर अपक्ष म्हणून मिलिंद कांबळे, नीना खेडेकर, फरहाना सय्यद, राजेश त्रिपाठी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय बाला नाडर यांनी आपकी अपनी पार्टी पीपल्स या पक्षाकडून अर्ज भरला आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरल्याने तसेच भाजपा-शिंदे गटाने नोटाचा कथित प्रचार केल्याने ठाकरे गटाच्या गोटात अस्वस्थता आहे. 

Web Title: Andheri East By Election Result Update: Seven seats in six states! Counting of votes for Andheri by-election today; Udddhav Thackeray's Shivsena Rutuja Latke will win?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.