उद्योग प्रक्रिया सोपी करण्यात आंध्र-तेलंगण १, महाराष्ट्र ९ व्या स्थानी

By admin | Published: October 31, 2016 02:50 PM2016-10-31T14:50:51+5:302016-10-31T14:50:51+5:30

केंद्र सरकारने सोमवारी उद्योग-व्यवसायासाठी सर्वाधिक अनुकूल असलेल्या राज्यांसंबंधीचा एक अहवाल प्रसिद्ध केला.

Andhra Pradesh-Telangana 1, Maharashtra 9th place to simplify the industry process | उद्योग प्रक्रिया सोपी करण्यात आंध्र-तेलंगण १, महाराष्ट्र ९ व्या स्थानी

उद्योग प्रक्रिया सोपी करण्यात आंध्र-तेलंगण १, महाराष्ट्र ९ व्या स्थानी

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३१ - उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी सुविधा तसेच व्यवसाय सुरु करण्याची प्रक्रिया अधिक सोपी सुटसुटीत करणा-या राज्यांमध्ये आंध्रप्रदेश आणि तेलंगण ही दोन राज्ये संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आली आहेत. केंद्र सरकारने सोमवारी उद्योग-व्यवसायासाठी सर्वाधिक अनुकूल असलेल्या राज्यांसंबंधीचा एक अहवाल प्रसिद्ध केला.  
 
त्यामध्ये गुजरातने पहिले स्थान गमावले आहे. महाराष्ट्र या यादीत नवव्या  स्थानावर आहे. गुजरातची थेट दुस-या क्रमांकावर घसरण झाली आहे. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात पहिल्या स्थानावर होते. ३४० निकष लक्षात घेऊन ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. 
 
आंध्रप्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांना ९८.७८ टक्के मिळाले. जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी दोन्ही राज्यांमध्ये कमालीची स्पर्धा आहे. छत्तीसगड चौथ्या स्थानावर कायम आहे. 
राज्यांची क्रमवारी 
१) तेलंगण, आंध्रप्रदेश
२) गुजरात 
३) छत्तीसगड
४) मध्यप्रदेश
५) हरयाणा
६) झारखंड
७) राजस्थान
८) उत्तराखंड 
९) महाराष्ट्र 
 

Web Title: Andhra Pradesh-Telangana 1, Maharashtra 9th place to simplify the industry process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.