ङोंडू ‘फुल्ल’ला
By admin | Published: October 3, 2014 12:14 AM2014-10-03T00:14:47+5:302014-10-03T00:14:47+5:30
दस:यानिमित्त मार्केट यार्डात गुरुवारी ङोंडूच्या फुलांची तब्बल सातशे टन (7 लाख किलो) आवक झाली.
Next
>पुणो : दस:यानिमित्त मार्केट यार्डात गुरुवारी ङोंडूच्या फुलांची तब्बल सातशे टन (7 लाख किलो) आवक झाली. विक्रमी आवक होऊनही मागणी वाढल्याने ङोंडूला घाऊक बाजारातच प्रतवारीनुसार किलोमागे 2क् ते 6क् रुपये भाव मिळाला.
दस:यासाठी गेल्या दोन दिवसांपासून ङोंडूसह विविध फुलांची बाजारात मोठय़ा प्रमाणात आवक होत आह़े गेल्या वर्षी दस:याच्या आदल्या दिवशी सव्वातीन लाख किलो ङोंडूची आवक झाली होती़ यंदा त्यात वाढ झाली आहे. बाजार समितीकडे 4 लाख 82 हजार 255 किलो ङोंडूची आवक झाल्याची नोंद झाली आहे. तर, शेतक:यांनी स्वत: सव्वादोन लाख किलो फुलांची विक्री केल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली. गुरुवारी पहाटेपासूनच फुलांची बाजारात आवक झाली. त्यामुळे बाजाराशेजारील पेट्रोलपंपापासून ते गेट नंबर 9 र्पयत वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहतूककोंडीदेखील झाली होती़ आवक वाढल्याने यंदाही भुसार विभागातील गेट क्रमांक 5 वरील रस्त्यावर विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
ङोंडूबरोबर गुलछडीची 5 हजार 46क् किलो, तुळजापुरी ङोंडू 5 हजार किलो, बिजली 2 हजार किलो व पांढ:या शेवंतीची 3 हजार किलो आवक झाली़ सोलापूर, सातारा, वाई, पुरंदर, अकलूज, टेंभुर्णी, करमाळा येथून फुलांची आवक झाली़ पिवळ्य़ा ङोंडूला प्रतवारीनुसार किलोमागे 2क् ते 4क् रुपये, केशरी ङोंडू 2क् ते 6क् रुपये, तर गुलछडीला 16क् ते 25क् रुपये, बिजली 8क् ते 12क् व पांढ:या शेवंतीस 6क् ते 22क् रुपये भाव मिळाला.