२० हजार महिलांना अंगणवाडी नोकऱ्या; ३१ मेपर्यंत कालबद्ध भरती प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 06:07 AM2023-02-24T06:07:03+5:302023-02-24T06:07:14+5:30

सर्व अंगणवाड्या होणार अपडेट, नव्याने सुरू होणाऱ्या अंगणवाड्यांमध्येही खेड्यातील शिक्षित महिलांना नोकऱ्या मिळणार आहेत.

Anganwadi jobs for 20 thousand women; Time bound recruitment process till 31st May | २० हजार महिलांना अंगणवाडी नोकऱ्या; ३१ मेपर्यंत कालबद्ध भरती प्रक्रिया

२० हजार महिलांना अंगणवाडी नोकऱ्या; ३१ मेपर्यंत कालबद्ध भरती प्रक्रिया

googlenewsNext

अविनाश साबापुरे 

यवतमाळ : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व अंगणवाड्यांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्या महसुली गावात अंगणवाडी नाही तेथे नवीन अंगणवाडी उघडली जाणार आहे. त्यासाठी तब्बल २० हजार ६०१ जुनी रिक्त पदे भरली जाणार आहेत.

तसेच नव्याने सुरू होणाऱ्या अंगणवाड्यांमध्येही खेड्यातील शिक्षित महिलांना नोकऱ्या मिळणार आहेत. ‘एकात्मिक बालविकास सेवा योजना’ या केंद्र पुरस्कृत योजनेतून महाराष्ट्रात अंगणवाड्या चालविल्या जातात. त्यामुळे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात आणताना या सर्व अंगणवाड्या अपडेट करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेच २०१७ पासून रिक्त असलेली २० हजार पदे भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. येत्या ३१ मेपूर्वी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे भरण्याचे निर्देश एकात्मिक बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत.  

महाराष्ट्रात दोन लाख पदांना मंजुरी   
महाराष्ट्रात ९७ हजार ४७५ अंगणवाडी सेविका तर १३ हजार ११ मिनी अंगणवाडी सेविका आणि ९७ हजार ४७५ अंगणवाडी मदतनीस अशी २ लाख ७ हजार ९६१ पदे मंजूर आहेत. यापैकी २० हजार ६०१ पदे रिक्त आहेत. नोव्हेंबर २०२२ च्या मासिक प्रगती अहवालानुसार अंगणवाडी सेविकांची ४ हजार ५०९, मिनी अंगणवाडी सेविकांची ६२६ आणि अंगणवाडी मदतनीसांची १५ हजार ४६६ अशी एकूण २० हजार ६०१ पदे रिक्त आहेत. ती ३१ मेपर्यंत भरण्याचे निर्देश आहेत.

अंगणवाडी सेविकांचा बांगडी मोर्चा 
गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलने करत असून, सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी अंगणवाडी सेविकांनी आपल्या मानधनवाढीच्या मागणीसाठी बांगडी मोर्चा काढला. या अनोख्या मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यापूर्वीही सोलापुरातील या अंगणवाडी सेविकांनी चटणी-भाकरी मोर्चा काढला होता. 

बारावी  उत्तीर्ण हवी, उच्च शिक्षणालाही स्थान   
नव्या पदभरतीमध्ये अंगणवाडी सेविका किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय तिच्याकडे पदवी, पदव्युत्तर पदवी, अन्य उच्च शिक्षण असल्यास भरती प्रक्रियेत त्या शिक्षणासाठी विशेष गुणांचा भारांश दिला जाणार आहे. शिवाय किमान ३५ वर्षे ही वयोमर्यादाही घालण्यात आली आहे. शिवाय संबंधित उमेदवार खेड्यातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. 

Web Title: Anganwadi jobs for 20 thousand women; Time bound recruitment process till 31st May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.