सोलापूरातील अंगणवाडी तार्इंची उपासमार

By admin | Published: September 2, 2016 03:26 PM2016-09-02T15:26:09+5:302016-09-02T15:26:09+5:30

अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी सेविकांच्या विविध मागण्या संदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.

Anganwadi trenchas in Solapur | सोलापूरातील अंगणवाडी तार्इंची उपासमार

सोलापूरातील अंगणवाडी तार्इंची उपासमार

Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २ -  अंगणवाडी सेविका, मिनी सेविका, मदतनिस यांचे गेल्या जून, जुलै, आॅगस्ट या तीन महिन्यांचे मानधन अद्याप दिलेली नाही़ त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपासमारीत दिवस काढत आहेत. जगाव की मरावं हा संतप्त सवाल अंगणवाडी कर्मचारी विचारत आहेत़ झोपेचं सोंग घेतलेल्या शासनानी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. आमदारांचे लाखो रूपये मानधन वाढविण्याचा ठराव विधानसभेत एकमताने ५ मिनिटात मंजूर करण्यात आला़ पण तळागाळातील गरीब, विधवा, परितक्त्या, प्रौढ कुमारीका यांच्या मानधनवाढीबाबत सरकारच काय तर विरोधी पक्ष ही गप्प आहे. ही संतापजनक बाब असल्याची टिका अंगणवाडी राज्य संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुर्यमणी गायकवाड यांनी व्यक्त केले़ 
अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी सेविकांच्या विविध मागण्या संदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते़  यावेळी जिल्हा सरचिटणीस सरला चाबुकस्वार, सरचिटणीस बृजपाल सिंह, कार्याध्यक्षा मंगला सराफ, अध्यक्ष एम़ए़पाटील आदी अंगणवाडी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्हाभरातून आलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका मोठया संख्येने उपस्थित होते़  यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ 
या आहेत मागण्या...
अंगणवाडी कर्मचाºयांना शासकीय सेवेचा दर्जा द्या़
किमान वेतन १८ हजार द्या़
खाजगीकरणाचा कुटील डाव बंद करा़
मिनी अंगणवाडी सेविकांना मोठया अंगणवाडीचा दर्जा द्या़
अंगणवाडी कर्मचाºयांना योजनाबाहर््य कामे देवू नये़
गहू भरडण्याचे पैसे द्या़
इंधन बिल व रॉकेल किंवा सिलेंडर द्या़
 
आहार व टी़एच़आर निकृष्ट दर्जाचा
शहरी व ग्रामीण भागात झोपडपट्टयामध्ये अंगणवाड्या चालतात़ या अंगणवाड्यामध्ये मुलांचे कुपोषण निर्मुलनाचे काम अत्यंत प्रभावीपणे या कर्मचारी करीत असतात़ खºया अर्थाने अंगणवाडीतील मुले हीच पुढे जावून देशाचे भवितव्य घडविणार असतात़ अशा मुलांना शासनाकडून दिला जाणारा आहार, टी़एच़आर हे अत्यंत निकृष्ट दर्जाचा दिला जातो़ याकडेही संघटनेनी वेळोवेळी तक्रार करूनदेखील कोणीही याकडे दखल दिले नाही असेही अंगणवाडी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुर्यमनी गायकवाड यांनी सांगितले़

Web Title: Anganwadi trenchas in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.