उमा पानसरे यांची अँजिओग्राफी; प्रकृती स्थिर
By admin | Published: September 23, 2015 01:00 AM2015-09-23T01:00:55+5:302015-09-23T01:00:55+5:30
कॉ. गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी घराशेजारी असलेल्या बागेतून फि रून आल्यानंतर काही वेळातच त्यांच्या छातीत दुखू लागले.
कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी घराशेजारी असलेल्या बागेतून फि रून आल्यानंतर काही वेळातच त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे सर्व तपासण्या करण्यात आल्या़ अँजिओग्राफीही करण्यात आली़
सर्व तपासण्या आणि अँजिओग्राफीचा रिपोर्ट नॉर्मल आहे़ औषधोपचारामुळे उमा पानसरेंच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून देखरेखीसाठी त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे़ बुधवारी त्यांना डिस्जार्च देण्यात देणार आहे, अशी माहिती डॉ़ अजय केणी यांनी पत्रकारांना दिली़ दरम्यान, ही घटना समजातच पानसरे कुटुंबीयांशी संबंधित नागरिकांनी आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सकाळपासूनच रीघ लावली होती. डॉक्टर अजय केणी आणि मेघा पानसरे यांनी पानसरे यांच्या प्रकृतीविषयी काही काळजी करण्याचे कारण नाही, असे सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला़