नाराज नगरसेवकांचे पक्षांतर

By admin | Published: May 8, 2016 01:37 AM2016-05-08T01:37:30+5:302016-05-08T01:37:30+5:30

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच स्वपक्षात नाखूश नगरसेवकांनी अन्य पक्षांमध्ये उड्या मारण्यास सुरुवात केली आहे़ आठवड्याभरातच विविध पक्षांच्या नऊ नगरसेवकांनी

Angry corporators' transit | नाराज नगरसेवकांचे पक्षांतर

नाराज नगरसेवकांचे पक्षांतर

Next

मुंबई : महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच स्वपक्षात नाखूश नगरसेवकांनी अन्य पक्षांमध्ये उड्या मारण्यास सुरुवात केली आहे़ आठवड्याभरातच विविध पक्षांच्या नऊ नगरसेवकांनी पक्षांतर केले
आहे़ यामध्ये मनसेतील नाराजांची संख्या अधिक आहे़ मागाठाणे
येथील मनसेचे नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी शनिवारी भाजपात प्रवेश केला.
पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक आहे़ काही महिन्यांतच विभागवार आरक्षण जाहीर
होणार आहे़ लोकसभा व
विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाची लाट होती़ पालिका निवडणुकीतही भाजपाचा प्रभाव कायम राहिल्यास, आपली राजकीय कारकीर्द सुरक्षित करण्यासाठी अनेकांनी भाजपाचा मार्ग
धरला आहे़, अशी चर्चा रंगली आहे.
यापैकी तीन नगरसेवकांनी शनिवारी भाजपात प्रवेश केला़
प्रत्येक पक्षात कोणी ना कोणी नाराज व असमाधानी
असतेच़ निवडणुकीच्या काळात या नाराजांच्या पक्षांतराला सुरुवात होते़ याचा सवार्धिक फटका यावेळी मनसेला बसला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत मनसेला मुंबईत अपयश
आल्याने महापालिका निवडणुकीत पक्षाला कितपत यश मिळेल,
याची धास्ती मनसेतील नगरसेवकांना आहे़ या राजकीय असुरक्षिततेतूनच काही नगरसेवक भाजपा अथवा आपल्या पूर्वीच्या पक्षात
म्हणजेच शिवसेनेत परतले आहेत़ (प्रतिनिधी)

आतापर्यंत यांनी केला दुसऱ्या पक्षात प्रवेश
- भारतीय कामगार पक्षाच्या खैरुन्नीसा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला़
- काँग्रेसच्या केसरबेन पटेल यांनी भाजपात प्रवेश केला़
- राष्ट्रवादीच्या नगरसेविका सविता पवार यांनीही शिवसेनेत प्रवेश केलां़

मनसेचे ईश्वर तायडे, सुरेश आवळे, गीता चव्हाण, अपक्ष नगरसेवक विजय तांडेल यांनी सेनेत़, तर सुखदा पवार, प्रवीण दरेकर यांनी भाजपात प्रवेश केला़

Web Title: Angry corporators' transit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.