इंग्रजी शाळा संचालक सरकारवर नाराज

By Admin | Published: March 20, 2017 03:51 AM2017-03-20T03:51:25+5:302017-03-20T03:51:25+5:30

राज्यातील इंग्रजी शाळांमधील शिक्षणाच्या कायद्यानुसार (आरटीई) झालेल्या प्रवेशांचा गेल्या पाच वर्षांतील फी परतावा अद्याप

Angry on the government of the English School Director | इंग्रजी शाळा संचालक सरकारवर नाराज

इंग्रजी शाळा संचालक सरकारवर नाराज

googlenewsNext

मुंबई : राज्यातील इंग्रजी शाळांमधील शिक्षणाच्या कायद्यानुसार (आरटीई) झालेल्या प्रवेशांचा गेल्या पाच वर्षांतील फी परतावा अद्याप संस्थाचालकांना मिळालेला नाही. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातही फी परताव्यासाठी कोणतीही तरतूद झालेली नाही. म्हणूनच महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेने अर्थसंकल्पाचा निषेध नोंदवला आहे.
संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे-पाटील म्हणाले की, इंग्रजी शाळांच्या माध्यमातून आरटीई अंतर्गत राज्यात हजारो प्रवेश देण्यात आले. या वर्षीही प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबवली जात आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून मोफत प्रवेशाचा मोबदला शाळा आणि संस्थाचालकांना मिळालेला नाही, सरकारला फी परताव्याचे विस्मरण झाल्याचे दिसते. (प्रतिनिधी)

Web Title: Angry on the government of the English School Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.