मराठा समाज सरकारवर नाराज
By admin | Published: September 2, 2016 02:02 AM2016-09-02T02:02:48+5:302016-09-02T02:02:48+5:30
आघाडी सरकारच्या काळात जाहीर करण्यात आलेले मराठा आरक्षण सध्याचे सरकार देत नसल्याने या समाजात सरकारबद्दल तीव्र नाराजीची भावना असल्याचे मत माजी
मुंबई : आघाडी सरकारच्या काळात जाहीर करण्यात आलेले मराठा आरक्षण सध्याचे सरकार देत नसल्याने या समाजात सरकारबद्दल तीव्र नाराजीची भावना असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केले. ते पत्र परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले की, सरकारने मराठा आणि धनगर आरक्षण विशिष्ट तारखेच्या आत देण्याचे जाहीर केले नाही तर जनक्षोभ आणखी वाढेल. मराठा समाजाचे जे मोर्चे सध्या निघत आहेत ते राजकीय वरदहस्ताशिवाय शक्य नाहीत पण त्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते आहेत. विशेषत: कोणत्याही नेत्यांकडे या मोर्चांचे नेतृत्व नाही. कोणताही राजकीय चेहरा नसतानाही मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे निघत आहेत. यावरून सरकारने मराठा समाजाची भावना समजून घेत मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घेतला पाहिजे.
राणे यांनी दावा केला की, मराठा समाजाच्या प्रचंड मोर्चांच्या भीतीनेच राज्य सरकारने अंतर्गत सुरक्षा कायद्याचा मसुदा आणला होता पण प्रचंड टीकेनंतर आता तो त्यांना मागे घ्यावा लागला आहे. (विशेष प्रतिनिधी)
केंद्राच्या मर्जीवर मुंबईला जगावे लागणार : जीएसटीबाबत ते म्हणाले की केंद्र व राज्यात काँग्रेसचे सरकार असते तर मुंबईला जीएसटीपासून मुक्ती दिली असती. केंद्र सरकारच्या मर्जीवर राज्य आणि मुंबईला लाचारीचे जीणे जीएसटी लागू झाल्यानंतर जगावे लागणार आहे.