अनिल अंबानी यांनी तिसऱ्यांदा सरकारची रक्कम थकविली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 11:06 AM2019-04-27T11:06:45+5:302019-04-27T11:07:15+5:30

कर्जाच्या खाईत गेलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने दिवाळखोर घोषित करण्यापासून वाचविण्याचा दावा नॅशनल कंपनी लॉ अॅपिलेट ट्रिब्युनलकडे (एनसीएलएटी) कडे करणार असल्याचे कारण दिले आहे.

Anil Ambani defaulted third time government's money | अनिल अंबानी यांनी तिसऱ्यांदा सरकारची रक्कम थकविली

अनिल अंबानी यांनी तिसऱ्यांदा सरकारची रक्कम थकविली

मुंबई : रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) पुन्हा एकदा टेलिकॉम स्पेक्ट्रमची थकीत रक्कम देण्यास अपयशी ठरले आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अनिल अंबानी यांची कंपनी सलग तीनवेळा थकबाकीदार बनली आहे. 


कर्जाच्या खाईत गेलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने दिवाळखोर घोषित करण्यापासून वाचविण्याचा दावा नॅशनल कंपनी लॉ अॅपिलेट ट्रिब्युनलकडे (एनसीएलएटी) कडे करणार असल्याचे कारण दिले आहे. यामुळे टेलिकॉम खात्याला 492 कोटी रुपये न देण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीने डॉटला सांगितले. 


नॅशनल कंपनी लॉ अॅपिलेट ट्रिब्युनल 30 एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी घेणार आहे. याचवेळी आरकॉमच्या स्पेक्ट्रम संदर्भात कारणे दाखवा नोटीस द्यावी की नाही यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती टेलिकॉम मंत्रालयाने दिली आहे.  


१३ मार्चपर्यंत २१ कोटी रुपये स्पेक्ट्रमसाठी देय होते. ही रक्कम न भरल्यामुळे स्पेक्ट्रमची रक्कम वाढून २८१ कोटी झाली. यासाठी ५ एप्रिलची डेडलाइन टेलिकॉम मंत्रालयाने रिलायन्सला दिली. पण ती डेडलाइनही रिलायन्सने चुकवली. त्यामुळे ही रक्कम वाढून ४९२ कोटी झाली आणि टेलिकॉम मंत्रालयाने १९ एप्रिलची डेडलाइन दिली. आता ही तिसरी डेडलाइनही रिलायन्सने चुकवली आहे. 
 

Web Title: Anil Ambani defaulted third time government's money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.