अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; १० जानेवारीपर्यंत कारागृहात मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 07:49 AM2021-12-28T07:49:12+5:302021-12-28T07:49:21+5:30

Anil Deshmukh : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीने देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रींगचा गुन्हा नोंदवला होता. 

Anil Deshmukh's judicial custody extended; Stay in jail till January 10 | अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; १० जानेवारीपर्यंत कारागृहात मुक्काम

अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; १० जानेवारीपर्यंत कारागृहात मुक्काम

Next

मुंबई :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांना १० जानेवारीपर्यंत ऑर्थर रोड कारागृहात मुक्काम कारावा लागणार आहे. 

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीने देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रींगचा गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यात देशमुखांना अटक करण्यात आली. तर राज्य सरकारने परमबीर यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना केली.  

दुसरीकडे चांदीवाल आयोगासमोरील चौकशी दरम्यान निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना कोणतीही आर्थिक मागणी केली नव्हती. तसेच त्यांनी कोणत्याही बारमालकांकडून पैसे घेतले नाहीत, असा जबाब दिला होता.

तसेच परमबीर सिंह यांनीदेखील प्रतिज्ञापत्रा व्यतिरिक्त काहीही पुरावे नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे  सोमवारी त्यांची न्यायालयीन कोठडी संपत असल्याने त्यांना जामीन मंजूर होईल याबाबत चर्चा होती. मात्र, तरी देखील त्यांच्या कोठडीत  १४ दिवसांची वाढ झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

Web Title: Anil Deshmukh's judicial custody extended; Stay in jail till January 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.