Anil Gote : "दगलबाज, कपटी देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका"; अनिल गोटेंचं एकनाथ शिंदेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 12:30 PM2022-07-03T12:30:49+5:302022-07-03T12:41:58+5:30

Anil Gote letter to Eknath Shinde and Slams Devendra Fadnavis : अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी शिंदेंना सल्ला देत काही अनुभव सांगितले आहे. 

Anil Gote letter to CM Eknath Shinde and Slams BJP Devendra Fadnavis | Anil Gote : "दगलबाज, कपटी देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका"; अनिल गोटेंचं एकनाथ शिंदेंना पत्र

Anil Gote : "दगलबाज, कपटी देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका"; अनिल गोटेंचं एकनाथ शिंदेंना पत्र

googlenewsNext

मुंबई - राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. याच दरम्यान माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी शिंदेंना सल्ला देत काही अनुभव सांगितले आहे. 

"ज्येष्ठ म्हणून वडीलकीचा सल्ला देतो, मानला तर आपलाच फायदा आहे. किमान फसवणूक व नंतर पश्चाताप होणार नाही" असं एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. तसेच दगलबाज देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातदेखील विश्वास ठेवू नका असं म्हणत बोचरी टीका केली आहे. गोटे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे पत्र ट्विट केलं आहे. "देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका. मी कुठलाही स्वार्थ, काडी इतकी लाभाची अपेक्षा ठेवली नाही. या नीच, हलकट, पाताळयंत्री, दगलबाज, कपटी, खोटे बोलण्याचे अनन्यसाधारण अंगभूत गुण असलेल्या माणसावर श्रद्धा ठेवली. विश्वास ठेवला. हा माणूस चुकून सुध्दा दगलबाजी करणार नाही, असे मला वाटले होते. मी त्यावेळी भाजपचा आमदार होतो. ते मुख्यमंत्री होते. रात्री दहा वाजेपासून दोन वाजे पर्यंत सलग चार तास चर्चा केली." 

"मी स्वतःहून म्हणालो साहेब तुम्हाला काही अडचण असेल तर मोकळेपणाने सांगा. मी स्वतःहून बाजूला होतो. हा हलकट लबाड म्हणतो कसा ‘गोटेसाहेब तुम्ही पक्षाचे एसेट आहात. तुम्हाला मी शब्द नव्हे वचन देतो. उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत जाहीर करतो. ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषदेत जाहीर केले. मी स्वतः भेटून आभार मानले, मला शुभेच्छा दिल्या. कुठलीही सभ्य सुसंकृत खानदानी व्यक्ती एखाद्या व्यक्तीने एवढे सर्व सांगितल्यावर अविश्वास दर्शवेल कसा? मी  प्रामाणिकपणे व एका निष्ठेने वागत आलो. स्वर्गीय वसंतराव भागवत, स्वर्गीय रामभाऊ गोडबोले अशा ऋषीतुल्य व्यक्तींचे संस्कार असल्याने व त्यांच्या देवरदुर्लभ सहवासामुळे तसेच दिलेला शब्द प्राण गेला तरी बेहत्तर पण तसूभरही मागे न हटणाऱ्या नितीन गडकरी साहेबांनी अत्यंत संकटकाळी दिलेल्या आधाराच्या पाश्वर्वभूमीवर माझ्या मनात शंका येवूच कशी शकेल?" असं पत्रात म्हटलं आहे. 

"मी एक लहान कार्यकर्ता! मी त्यांना मदत तरी काय करणार? साहेब तर, जाम खू असत. अनेकदा प्रेमाने रागवत! किती दिवस अस कफल्लक राहशील? शिवसेनेत ये. तुझ्या आयुष्याचं सोनं करुन टाकतो. मला बाकी काही नकोच होतं. प्रेमाची भूक भागविली जात होती. मणी नावाचे एक पी. ए . होते. साहेबांनी त्यांना सांगfतलं आत्ताच्या आत्ता पत्रकारांना बोलवा "आज या गोट्याला, सोडायच नाही" असे म्हणाले.  पण साहेबांच्या प्रेमाशिवाय मला काही नकोच होतं. मनोहर जोशी यातील काही प्रसंगाचे साक्षीदार आहेत. तेलगी प्रकरणातून तब्बल चार वर्षानंतर बाहेर आलो. पहिला फोन कै. गोपीनाथ मुंडे साहेबांचा! दुसरा बाळासाहेबांचा, तिसरा नितीनजींचा ! साहेबांनी तर सौ. हेमा, मुलगा तेजस यांना आवर्जून जेवायला बोलवलं."

"मी हे सगळं यासाठी सांगितल की, आभाळाएवढ्या उंच उंच व्यक्तीनी मला दिलेला विश्वास, प्रेम आणि आपुलकी कुठे ? आणि फडणवीसांची दगलबाजी कुठे? आजही मनोहर जोशींना विचारा सर्व संधी उपलब्ध असतांना कधी एका तांबड्या पैशाची मदतीची अपेक्षा केली का? देवेंद्र फडणवीस यांना माझा काडीचाही त्रास नसताना त्यांच्याइतपत हलकट, नीच, लबाड, धोकेबाज व भ्रष्ट दुराचारी मित्रांचा आत्मा संतुष्ट करण्यासाठी माझ्या सारख्या धनगर समाजातील कार्यकत्याचा छळ केला. मनाचा तका क्षुद्र की आपल्याकडून अनवधानाने का होईना पण अन्याय झाला, हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्याकडे नाही. अशा राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीपासून सावध रहावे अशी मनोमन भावना असल्याने आलेला अनुभव शेअर केला. परमेश्वर अशा पशुतुल्य राक्षसी संकटापासून आपले रक्षण करो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना" असं अनिल गोटे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. 
 

Web Title: Anil Gote letter to CM Eknath Shinde and Slams BJP Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.