अनिल कपूरच्या स्टंटबाजीप्रकरणी पश्चिम रेल्वेची प्रॉडक्शन हाऊसला नोटीस
By admin | Published: July 15, 2016 05:02 PM2016-07-15T17:02:37+5:302016-07-15T19:13:07+5:30
लोकल रेल्वेवर चढून स्टंटबाजी केल्याने अभिनेता अनिल कपूरला पश्चिम रेल्वेने नोटीस पाठवली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 15 - मालिकेचे प्रमोशन करताना लोकल रेल्वेवर चढून अभिनेता अनिल कपूरने स्टंटबाजी केल्याप्रकरणी पश्चिम रेल्वेने संबंधित प्रॉडक्शन हाऊसला नोटीस पाठवली आहे. अनिल कपूरने एका मालिकेसाठी लोकलवर चढून स्टंटबाजी केली. पश्चिम रेल्वेने अनिल कपूरपासून इतरांनी प्रभावित होऊ नये यासाठी नोटीस पाठवली आहे. सात दिवसांमध्ये आपली बाजू मांडण्याचेही रेल्वेने या प्रॉडक्शन हाऊसला सांगितले आहे.
अनिल कपूरची नवी मालिका लवकरच सुरु होत आहे. त्यासाठी अनिल कपूरने चर्चगेट स्टेशनवरुन शुटिंगसाठी परवानगी मागितली होती. रेल्वेने अनिल कपूरला शुटिंगसाठी परवानगी दिली होती. मात्र परवानगी देताना रेल्वेने प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये शुटिंग करण्यास मान्यता दिली होती. पण अनिल कपूरने फुटबोर्डवर चढून, लटकत स्टंटबाजी केली. इतकंच नाही तर चालत्या ट्रेनमधून लटकताना दिसला. त्यामुळे रेल्वेने यावर आक्षेप घेत, ही नोटीस पाठवली आहे.
विशेष म्हणजे पश्चिम रेल्वे फूटबोर्डवर उभे राहून स्टंट करू नये, धोकादायक प्रवास करू नये अशी मोहीम पश्चिम रेल्वे हाती घेत आहे.