अनिल परब यांना 'ईडी'चा दणका; साई रिसॉर्टसह १० कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 06:11 AM2023-01-05T06:11:16+5:302023-01-05T06:33:53+5:30

जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये दापोली येथील मुरूडमधील ४२ गुंठे जमीन (किंमत २ कोटी ७३ लाख) आणि साई रिसॉर्ट (किंमत ७ कोटी ४६ लाख) ) आदींचा समावेश आहे.

Anil Parab gets 'ED' bump; 10 crore property seized including Sai Resort | अनिल परब यांना 'ईडी'चा दणका; साई रिसॉर्टसह १० कोटींची मालमत्ता जप्त

अनिल परब यांना 'ईडी'चा दणका; साई रिसॉर्टसह १० कोटींची मालमत्ता जप्त

googlenewsNext

मुंबई : दापोली येथील वादग्रस्त ठरलेल्या साई रिसॉर्टप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परव यांची १० कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये दापोली येथील मुरूडमधील ४२ गुंठे जमीन (किंमत २ कोटी ७३ लाख) आणि साई रिसॉर्ट (किंमत ७ कोटी ४६ लाख) ) आदींचा समावेश आहे.

या कारवाईबाबत ईडीकडून प्राप्त माहितीनुसार, दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी अनेक मुड्यांच्या अनुषंगाने तपास गेले अनेक दिवस सुरू होता. यामध्ये हे रिसॉर्ट सागरी नियंत्रण क्षेत्र-3 मध्ये येत असल्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय पर्यावरण विभागाने दापोली येथील न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रारही दाखल केली होती. तर सरकारी यंत्रणेवर प्रभाव टाकणे आणि सरकारच्या महसुलाचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत दापोली पोलिस ठाण्यामध्येदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी अनिल परब यांची जून महिन्यात चार वेळा चौकशी झाली होती. २१, २२ आणि २३ जूनला सलग तीन दिवस ईडीने परब यांची चौकशी केली होती. परब यांनी सदानंद कदम यांच्याशी संगनमत करून दापोली येथील प्रांत अधिकाऱ्यावर दबाव टाकून कृषक जमीन अकृषक करून घेतली, तसेच सीआरझेड तरतुदींचा उल्लंघन करीत बांधकाम केल्याचा ठपका सक्तवसुली संचालनालयाने ठेवला आहे.

ईडीचे म्हणणे....
• महसूल खात्याकडून अवैधरीत्या परवानगी घेत तेथील भूखंडावर तळ मजला एक असे दोन बंगले परब यांनी बांधले.
• या प्रकरणात आपले नाव येऊ नये याकरिता कागदोपत्री मूळ मालकाचे नाव परब यांनी कायम ठेवले होते आणि बांधकामासाठी अर्ज करताना मूळ मालकाची बनावट स्वाक्षरी केली होती.
• ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतेवेळी ही जागा सीआरझेड-३ मध्ये येत असल्याची बाब लपविली.
• याप्रकरणी आर्थिक व्यवहार रोखीने करण्यात आले होते. प्रकरण उजेडात आल्यानंतर परब यांनी केवळ कागदोपत्री ही जमीन सदानंद कदम यांच्या नावे केली होती.

काय म्हणाले अनिल परब?
"या रिसॉर्टशी माझा संबंध नाही. जी संपत्ती जप्त केलेली आहे त्याचे मालक सदानंद कदम आहेत. ईडीने या गोष्टी तपासलेल्या आहेत. त्यांची कारवाई चूक की बरोबर हे न्यायालय ठरवेल. मी न्यायालयात जाऊन न्याय मागेन. मला राजकीयदृष्ट्या बदनाम केले जात आहे."

प्रकरण कसे उजेडात आले?
• प्राप्तिकर विभागाने मार्च २०२२ मध्ये केलेल्या छापेमारी दरम्यान परब
यांनी २०१७ मध्ये दापोली येथे एक कोटी रुपयांना जमीन खरेदी केल्याची
माहिती पुढे आली.
• या जमिनीची नोंदणी २०१९ मध्ये झाली होती आणि परब यांनी ही जमीन सन २०२० मध्ये सदानंद कदम यांना एक कोटी दहा लाख रुपयांवर विकली होती. यावेळी या जागेवर रिसॉर्ट बांधलेले होते. मात्र, नोंदणी करताना रिसॉर्ट बांधल्याची माहिती दिली नव्हती, तसेच या बाधकामावर मुद्रांक शुल्क भरले नसल्याची माहिती त्यावेळी पुढे आली होती.

Web Title: Anil Parab gets 'ED' bump; 10 crore property seized including Sai Resort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.