सत्तार यांना पशुसंवर्धन, तर मधुकर चव्हाणांकडे परिवहन

By Admin | Published: June 7, 2014 01:05 AM2014-06-07T01:05:45+5:302014-06-07T01:05:45+5:30

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन नवीन मंत्र्यांना खाती बहाल करत इतर काही मंत्र्यांच्या खात्यात बदल केले आहेत़

Animal Husbandry of Sattar and transport to Madhukar Chavan | सत्तार यांना पशुसंवर्धन, तर मधुकर चव्हाणांकडे परिवहन

सत्तार यांना पशुसंवर्धन, तर मधुकर चव्हाणांकडे परिवहन

googlenewsNext
>नव्या मंत्र्यांना खाती बहाल : अमित देशमुख यांच्या उत्पादन शुल्क, अन्न व औषधी प्रशासन
मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन नवीन मंत्र्यांना खाती बहाल करत इतर काही मंत्र्यांच्या खात्यात बदल केले आहेत़ त्यानुसार नवे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पशुसंवर्धन , दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय हे खाते देण्यात आले. हे खाते सांभाळणारे मधुकर चव्हाण यांच्याकडे आता परिवहन खाते देण्यात आले. परिवहन खाते स्वत: मुख्यमंत्र्यांकडे होत़े नवे राज्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे उत्पादन शुल्क, अन्न व औषधी प्रशासन आणि पर्यटन ही खाती देण्यात आली़ यापूर्वी उत्पादन शुल्क खाते राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्याकडे होत़े त्यांच्याकडे आता ऊर्जा, वित्त व नियोजन, जलसंपदा आणि संसदीय कामकाज या खात्यांचे राज्यमंत्री राहील़ सतेज पाटील यांच्याकडे गृह, ग्रामविकास व फलोत्पादन ही तीन खाती कायम राहतील़ राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्याकडे पाणीपुरवठा व अन्न व नागरी पुरवठा ही कायम खाती कायम राहतील़ मात्र, त्यांच्याकडील पर्यटन खाते अमित देशमुखांकडे देण्यात आले. देशमुखांना खाती देताना मुख्यमंत्र्यांनी जवळच्या राज्यमंत्र्यांची खाती दिली. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या चार महिने आधी का होईना पण मधुकर चव्हाण यांना महत्त्वाचे खाते दिल़़े  

Web Title: Animal Husbandry of Sattar and transport to Madhukar Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.